पिंपरी-चिंचवड

प्रचाराच्या धुरळ्याने शहराच्या प्रदूषणात भर

CD

​पिंपरी, ता. १२ : पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस हवा प्रदूषण प्रमाण वाढत आहे. असे असताना महापालिका निवडणूक प्रचारात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रदूषणात भर घातली जात आहे. बहुतांश प्रभागांमध्ये प्रचार करताना फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी प्रचार करत असतानाच शहराचे पर्यावरण राखण्याचे भान मात्र सर्वच नेते विसरल्याचे चित्र दिसत आहे.

शनिवार-रविवार हे सुटीचे दिवस पाहून गेल्या दोन दिवसांत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, गाठीभेटी, रॅली यावर भर दिला. राजकीय पक्षांचे मोठे नेतेही शहरात ठाण मांडून होते. तर, दुसऱ्या बाजूला शहरात गेल्या काही दिवसांपासून हवेच्या गुणवत्तेचा स्तर घसरत आहे. शहराचा ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ अर्थात हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा १५० च्या वर म्हणजेच सरासरी ‘मध्यम प्रदूषित’ या प्रमाणात नोंदवला जात आहे. असे असतानाच प्रचार रणधुमाळीने यात भर टाकली आहे. प्रचारासाठी प्रभागांमध्ये फिरणाऱ्या उमेदवारांच्या रॅलीमध्ये फटाके फोडले जात असल्याने नागरिकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे आरोग्य धोक्यात आले असताना दुसरीकडे ‘भावी लोकप्रतिनिधी’ मात्र नियमांकडे काणाडोळा करत आहेत.

पीएम २.५, पीएम १० चे प्रमाण वाढले
शहरात सुरू असणारी रस्त्यांची कामे, मेट्रो मार्गिका, मोठ्या प्रमाणावर सुरू असणारी बांधकामे यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामध्येही ‘पीएम २.५’ व ‘पीएम १०’ (पीएम-पर्टिक्युलेट मॅटर) म्हणजे हवेतील अतिसूक्ष्म कण, ज्यांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो, जे श्वासावाटे फुफ्फुसात जाऊन आरोग्यासाठी घातक ठरतात आणि शहरीकरण, प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात वाढतात. हे घटक मुख्य प्रदूषक असल्याचे पुढे आले आहे. गेल्या वर्षीही शहरात श्‍वसनाच्या आजाराचे दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचा पर्यावरण अहवालातूनच समोर आलेले आहे.

विजयी झाल्यावर तरी ‘भान’ राखणार का ?
प्रचाराच्या तोफा मंगळवारी (ता.१३) शांत होतील. त्यानंतर गुरुवारी मतदान (१५) आणि शुक्रवारी (ता.१६)मतमोजणी आहे. आपला उमेदवार विजयी झाल्यानंतरचा जल्लोष हा गुलाल उधळून केला जातो. काही दिवसांनी मिरवणुका काढत आतषबाजी केली जाते. मात्र, सध्याची शहराची पर्यावरणाची स्थिती पाहून लोकप्रतिनिधी याचे भान राखणार का, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत

वाढलेले हवा प्रदूषण आणि हवामानात होणारे बदल यामुळे सध्या ब्रोन्कायटिस व ॲलेर्जेटिक सर्दी खोकला यांची मोठ्या प्रमाणावर साथ आहे. हे आजार बरे होण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागत आहे. प्रदूषणांमध्येही ‘पीएम १०’ व ‘पीएम २.५’ चे वाढलेले प्रमाणही श्‍वसनाच्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना मास्क वापरावा.
- डॉ. अभिषेक करमाळकर, वैद्यकीय तज्ज्ञ

PNE26V84670

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Khedkar Robbery : पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर मध्यरात्री दरोडा; नोकरानेच आखला कट!

Cricket Retirement: डिव्हिलियर्सला पहिल्याच सामन्यात बाद करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा; १२०+ विकेट्स नावावर

Ladki Bahin Yojana Update : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महायुती सरकारला झटका

Pune Municipal Election : पुण्यात प्रचाराचा धुरळा थांबणार; उद्या सायंकाळी ५ वाजता 'तोफा' थंडावणार!

Akola Political : पिढीजात काँग्रेस नेते श्यामशील भोपळे यांनी घेतले धनुष्यबाण हाती; मंत्री राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

SCROLL FOR NEXT