पिंपरी-चिंचवड

निवडणुकीमुळे पोलिस यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर

CD

पिंपरी, ता. १२ : महापालिका निवडणुकीदरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस दलातील चार हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात राहणार असून २ हजार गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) कर्मचारीही नेमणुकीस असतील. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पथसंचलनही केले आहे. पोलिसांनी १ हजार ३०६ परवानाधारक शस्त्रे जमा करुन घेतली आहेत.
मागील निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने ठिकाणी पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, दंगारोधक पथके, जलद प्रतिसाद पथक तसेच राज्य राखीव पोलिस दल तैनात असेल. तसेच निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून शहराच्या प्रवेशद्वारांवर तसेच प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. संशयित वाहने थांबवून झाडाझडती घेतली जात आहे. विशेषतः रात्रीच्यावेळी बाहेरून येणाऱ्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर आहे.

गुन्हेगारांवर कारवाई
निवडणुकीदरम्यान दहशत निर्माण करू शकणाऱ्या सराईत गुंड, टोळ्यांचे प्रमुख, तसेच राजकीय पाठबळावर वावरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अनेकांवर मकोका, तडीपारी, प्रतिबंधक नोटिसा, बॉण्ड भरून घेणे आणि ठाण्यात हजेरी बंधनकारक करण्याची कारवाई केली आहे. काही गुन्हेगारांना निवडणूक काळात शहराबाहेर ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मतदानाला विशेष सुरक्षा
मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. मतदान केंद्र परिसरात जमावबंदी लागू केली जाणार असून मतदारांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महिला पोलिस, होमगार्ड तसेच स्वयंसेवकांचीही मदत घेतली जाणार आहे. मतदान यंत्रे सुरक्षितपणे ने-आण करण्यासाठी स्वतंत्र सुरक्षा ताफा असणार आहे.

तब्बल ३६ उपद्रवी जिल्ह्याबाहेर
- पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ४२० इमारतींत २१३५ मतदान केंद्रे
- आचार संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ३४ तपासणी पथके
- ३६ उपद्रवींना पाठवले जिल्ह्याबाहेर
- परवाना धारकांची १३०६ शास्त्रे जमा केली.


असा असेल बंदोबस्त
पोलिस उपायुक्त - ८
सहायक आयुक्त - ११
पोलिस निरीक्षक - ४८
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक - २९१
अंमलदार - ३७३३
होमगार्ड - २०००
दंगा नियंत्रण पथके - ४
शीघ्र प्रतिसाद दलाच्या तुकड्या - २
एसआरपीएफ तुकडी - १

फोटो आयडी - 84819

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT