पिंपरी-चिंचवड

चार मते नोंदवली, तरच मतदान पूर्ण

CD

पिंपरी, ता. १३ : महापालिकेच्या ३२ प्रभागांतील १२८ पैकी दोन जागा बिनविरोध झाल्यामुळे १२६ जागांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. दोन प्रभागांत प्रत्येकी तीन आणि उर्वरित ३० प्रभागांत मतदारांना चार मते नोंदवणे अनिवार्य आहे. मतदान पूर्ण झाल्याची खात्री करुनच मतदारांनी केंद्रातून बाहेर पडावे, असे आवाहन आयोगाने केले आहे.
यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही बहुसदस्य प्रभाग पद्धती आहे. प्रत्येक प्रभागात ४ जागा (अ, ब, क आणि ड) असून मतदारांना चारही जागांसाठी स्वतंत्र मतदान करावे लागणार आहे. मात्र प्रभाग क्रमांक सहा आणि दहा या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे याठिकाणी प्रत्येकी तीन जागांसाठी तीन मते नोंदवावी लागणार आहे. तर उर्वरित प्रभागात चारही जागांसाठी स्वतंत्र मतदान करावे लागणार आहे. चार मते दिल्यानंतर ‘बीप’ वाजेल तेव्हाच मतदान पूर्ण झाल्याचे समजवावे. अन्यथा मत बाद होईल. मतदानासाठी ‘फोटो मतदार ओळखपत्र’, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, वाहन परवाना किंवा छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक यापैकी ओळखपत्र जवळ ठेवावे. नागरिकांना सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान करता येणार आहे.

मोबाइल नेल्यास कायदेशीर कारवाई
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल, कॉर्डलेस किंवा वायरलेस फोन नेण्यास मनाई आहे. नियम मोडल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मतदारांनी मोबाइल घरीच ठेवावेत किंवा १०० मीटरच्या बाहेर व्यवस्था करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मतपत्रिकेचे रंग
जागा ‘अ’: पांढरा रंग. जागा ‘ब’: फिका गुलाबी. जागा ‘क’: फिका पिवळा, जागा ‘ड’: फिका निळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP Election 2026 : उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं काय? कधी होणार घोषणा? वाचा...

Voter List: नवीन मतदारांसाठी महत्त्वाची माहिती! मतदार यादीत नाव आहे की नाही? अशा प्रकारे करा खात्री

Crime News : सटाण्यात 'देहविक्रय' करणाऱ्या टोळीला बेड्या; पोलिसांनी १६ हजारांच्या मुद्देमालासह तिघांना पकडले

Alandi Municipal Council : 'बुके ऐवजी बुक' देऊन नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत; आळंदी पालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व!

Pune News : चतुःश्रृंगी मंदिरासमोर बेघरांचा ठिय्या; शेकोट्यांमुळे प्रदूषणात वाढ आणि भाविकांची सुरक्षितता धोक्यात!

SCROLL FOR NEXT