पिंपरी, ता. १३ : आपल्या नेत्यांच्या जवळ जाणे, त्यांच्या नजरेत भरणे आणि ‘आपणच खरे निष्ठावंत’ असल्याचे सिद्ध करण्याची कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः चढाओढ लागली आहे. सभा, दौरे, स्वागत समारंभ, प्रचार फेऱ्यांमध्ये आता विचारधारेपेक्षा दिखाऊ निष्ठा अधिक ठळकपणे दिसून येत आहे.
नेता कार्यक्रमस्थळी येण्याआधीच काही कार्यकर्ते माईक हातात घेऊन घसा फुटेपर्यंत घोषणा देतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात घोषणा इतक्या तीव्र होतात की सामान्य नागरिकांना कार्यक्रमस्थळी थांबणेही कठीण होते. काही वेळा तर नेत्यांचे भाषणही घोषणांच्या गदारोळात झाकोळले जाते.
नेत्यांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. कुणी भव्य बॅनरबाजी करतो, कुणी कार्यकर्त्यांची कृत्रिम गर्दी जमवतो, तर कुणी आतषबाजीने कार्यक्रमाचे गांभीर्यच उडवून देतो. काही ठिकाणी तर ठरावीक कार्यकर्त्यांना नेत्यांच्या जवळ उभे राहण्यासाठीच विशेष ‘फिल्डिंग’ लावली जाते.
संघटनात्मक काम, जनतेशी संवाद, प्रश्नांची सोडवणूक या गोष्टी मागे पडत असून चमकोगिरी, दिखावा आणि क्षणिक प्रसिद्धी यांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते
---------------
जिवावर बेतणारी स्टंटबाजी
घोषणाबाजीने समाधान न झाल्यास पुढची पायरी म्हणजे स्टंटबाजी. मोठे हार, फुलांचे हार, पुष्पगुच्छ घेऊन कार्यकर्ते थेट स्टेजकडे धाव घेतात. जागा न मिळाल्यास बुलडोजर, क्रेन, ट्रॅक्टर किंवा उंच वाहनांचा वापर करून हार परिधान करण्याची धाडसी मात्र अत्यंत धोकादायक कसरत केली जाते. अनेकदा सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. एका क्षणाची चूक जिवावर बेतू शकते, याचे भानही या उत्साहात कार्यकर्त्यांना राहत नाही.
------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.