पिंपरी, ता.१४ : महापालिका निवडणूक काळात काही जणांना चांगलीच उत्पन्नाचे साधन मिळाले. प्रचारात सहभागी कार्यकर्ते, उमेदवारांचे प्रचारसाहित्य, भाड्याने घेतलेली वाहने, जेवणावळी, कार्यालयांसाठीचे मंडप यांसारख्या बाबींवर साधारणतः काही कोटीची उलाढाल झाली आहे. अगदी प्रिटींग प्रेसपासून केटरिंग, किराणा दुकानांमध्ये हे चलन फिरले. त्यामुळे शहराच्या अर्थकारणाला गती मिळाली.
गेल्या काही वर्षांत निवडणुका या कोट्यवधींच्या उलाढालीचे माध्यम ठरतात. अगदी उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचार आणि मतदानापासून निकालापर्यंत सर्वच गोष्टी पैशांच्या ‘तराजू’त मोजल्या जातात. तसेच रोजंदारीतून सरासरी १० दिवसांसाठी महिलांना काम मिळाले आहे. पन्नास-शंभर रुपये रोजाने घरकाम करणाऱ्या महिलांना या उमेदवारांकडून एका महिलेला ५०० रुपये रोजंदारी व जेवण मिळाले. प्रचार कार्यालयांना चहा-पाण्याची जार पुरवणे, केटरिंगसाठी मनुष्यबळ यातूनही रोजगार निर्मिती झाली. रोजंदारीवर अन्य ठिकाणी जाणारी पुरुष मंडळीही आपल्या प्रभागातील उमेदवारांच्या मदतीला हात देत त्यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसले.
जेवणावळी
कार्यकर्त्यांसाठी नाष्टा, दुपारचे जेवण, रात्री शाकाहारी-मांसाहारी भोजनावळी पार पडल्या. किराणा दुकानांतून दोन-अडीच लाखांच्या साहित्याच्या याद्या देण्यात आल्या. शहरातील किमान ४०० उमेदवारांकडून अशी व्यवस्था करण्यात आली. किमान १०० कार्यकर्त्यांचे येथे जेवण होते. गेल्या दहा दिवसांत जवळपास २५ कोटींची उलाढाल झाल्याचे बोलले जात आहे.
प्रचारसाठी वाहने अन्य राज्यांतून
प्रचाररथ, डिजिटल प्रचाराची तसेच कार्यकर्त्यांसाठीची वाहने यावर मोठा खर्च झाला. प्रभागात किमान दोन प्रचार कार्यालये उभारून कार्यकर्त्यांना बसा-उठायला, नियोजनासाठी मंडप उभारण्यात आले. काही जणांनी तर प्रचारासाठी अन्य राज्यांतून वाहने मागवली होती.
प्रचार साहित्यांची
प्रचारसाठीचे उपरणे, निशाणी, बिल्ले, स्टीकर्स, प्रिंटेड झेंडे, कटआउट, प्रचारपत्रके यातूनही मोठी उलाढाल झाली. फ्लेक्स प्रिंटींग आणि प्रचार साहित्यांची घाऊक विक्रेत्यांकडून मोठी मागणी राहिली. प्रभागात सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने किमान २५ हजार पत्रकांची छपाई केली. यातून मोठी उलाढाल आणि रोजगारनिर्मिती झाली.
PNE26V85820
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.