पिंपरी-चिंचवड

‘भारत फोर्ज’, ‘सॅण्डविक एशिया’, ‘देहूरोड ऑर्डिनेस’ची विजयी सलामी

CD

पिंपरी, ता. १४ ः औद्योगिक क्रीडा संघटनेच्यावतीने, आयोजित ६२ व्या औद्योगिक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. ‘भारत फोर्ज’, ‘सॅण्डविक एशिया’, ‘देहूरोड ऑर्डिनेस फॅक्टरी’, ‘जेसीबी’, ‘महेंद्रा चाकण’ या संघांनी विजयी प्रारंभ केला. ‘जेसीबी’च्या सुरेश देसाई याने तडाखेबंद फलंदाजी करत स्पर्धेतील पहिले शतक झळकाविले. तर महिंद्रा, चाकणच्या श्रीनिवास मोरे याने पहिली हॅटट्रिक साधली.
बजाज ऑटो, आकुर्डी, टाटा मोटर्स, पिंपरी आणि ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकी येथे स्पर्धेतील हे सामने भरविले जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये झालेल्या टाटा मोटर्सच्या मैदानावरील सामन्यात भारत फोर्ज संघाने एसएमआयटी स्पार्क मिंडावर ४ गडी राखून विजय मिळविला. नितीन तिंबोले हा सामनावीर ठरला.
याच मैदानावर दुपारच्या सत्रात ॲटलास कॉपको विरुद्ध सॅण्डविक एशिया यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये सॅण्डविक एशिया संघाने ८ गडी राखून विजय प्राप्त केला. विवेक अडकिते सामन्याचा मानकरी ठरला. ॲम्युनिशन फॅक्टरीच्या क्रीडांगणावर झालेल्या सामन्यात देहूरोड ऑर्डिनेस फॅक्टरी संघाने ‘केएसबी’ला २० धावांनी पराभूत केले. योगेश ओतुरकर सामनावीर ठरला.
दुपारच्या सत्रात जेसीबी विरुद्ध थरमॅक्स यांच्यातील सामन्यामध्ये जेसीबी संघाने ३१ धावांनी विजय मिळविला. त्यांच्या सुरेश देसाईने तडाखेबंद फलंदाजी करत ६१ चेंडूंत १३ चौकार, ५ षटकारांच्या साहाय्याने ११० धावा केल्या. तसेच त्याने स्पर्धेतील पहिले शतक नोंदविले. सुरेश देसाई हाच सामन्याचा मानकरी ठरला.
सकाळच्या सत्रामध्ये बजाज ऑटो आकुर्डी क्रीडांगण येथील सामन्यात एसएचटी आयटी सोल्युशन्सला महेंद्रा, चाकण विरुद्ध पाच विकेट राखून पराभव पत्करावा लागला. श्रीनिवास मोरे याने उत्कृष्ट गोलंदाजी करत स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक साधली. त्यालाच सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले.

निकाल
एसएमआयटी स्पार्क मिंडा ः २० षटकांत सर्वबाद १४५ - नीरज अधिकारी ३५, राहुल पोखरीयाल ३१, अरुण चोरगे २४ (नितीन तिंबोले ३-२२, राहुल शिरसकर ३-३०) पराभूत वि. भारत फोर्ज ः १८.५ षटकांत ६ बाद १४६ - आशिष आगळे ३५, सूरज बोरावके १८ (संदीप कारंडे २-१९).
ॲटलास कॉपको ः १८ षटकांत सर्वबाद ११७ - अरबाज खान २६, नहुष केळकर २१, अक्षय भामरे २५ (विवेक अडकिते ३-६, रमेश भोसले २-१५) पराभूत वि. सॅण्डविक एशिया ः १७.२ षटकांत २ बाद ११८ - विवेक अडकिते १८, संग्राम गावडे ४७, अक्षय ससाणे २२.
ऑर्डिनेस फॅक्टरी, देहूरोड ः २० षटकांत ८ बाद १५७ - योगेश ओतुरकर २३, रणजीत पाटील ३२, गणेश काळोखे २९, सर्जेराव टाकळकर २८ (वैभव वासव ३-१९) वि.वि. केएसबी ः २० षटकांत ८ बाद १३७ - हिमांशू लिमये ३३, अक्षय पवार २७ (योगेश ओतुरकर ३-१८, नवनाथ वाकडे २-२७).
जेसीबी ः २० षटकांत ५ बाद १८९ - सुरेश देसाई ११०, इमरान दादा २० वि.वि. थरमॅक्स ः २० षटकांत ६ बाद १५८ - केतन भिलारे २०, कार्तिक हिलाल ३४, अमित सिंग ३०, रवींद्र भोसले १९, सुशील मालुसरे २७ (अरुण मिश्रा २-२८, योगेश धामणकर २-२०).
एसएचटी आयटी सोल्युशन्स ः २० षटकांत ९ बाद १२४ : विशाल डोंगरे २४, हार्दिक मोरे ४३ (मोहन माहुलीकर २-२१, श्रीनिवास मोरे ४-१२) पराभूत वि. महेंद्रा, चाकण ः १८.१ षटकांत ५ बाद १२६ - फजल तांबोळी ३८, नामदेव पाटील १७, राजाराम पाटील ३१, श्रीनिवास मोरे २१ (रोहित भोई २-१३).
PNE26V85824

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

voting without voter ID : मतदार ओळखपत्र नसले तरीही करता येणार मतदान, जाणून घ्या कसं?

Big Blow: भारताच्या स्टार खेळाडूची IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेतूनही माघार; वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

Iran Calls India : अमेरिकेकडून हल्ला होण्याची भीती असताना, इराणने भारताला केला फोन अन्...

MCA: मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय! रोहित - रहाणेसह IPL खेळणाऱ्या खेळाडूंना देणार नाही करार; कारण घ्या जाणून

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT