पिंपरी-चिंचवड

वेळ, संयम आणि उत्साहाची कसोटी

CD

पिंपरी, ता. १५ : पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी गुरुवारी (ता. १५) मतदानाचा दिवस सुरू झाला. मात्र, हा महत्वाचा दिवस मतदारांसाठी अडचणींनी भरलेला ठरला. कुठे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने मतदान प्रक्रिया काही काळ थांबली, तर कुठे मतदार यादीत नाव सापडत नसल्याने नागरिक संभ्रमात पडले. अनेक प्रभागांमध्ये मतदान केंद्रे बदलल्याने मतदारांना एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर भटकंती करावी लागली. परिणामी, उत्साहाने मतदानासाठी आलेल्या मतदारांचा वेळ, संयम आणि उत्साह या सगळ्यांचीच कसोटी लागल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळाले.
ताथवडे येथील रमण नाना पवार सभागृहातील नरसिंह विद्यालय मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अवघ्या पाच मिनिटांत जनरेटर सुरू करून मतदान पुन्हा सुरळीत करण्यात आले. अनेक मतदारांची नावे वेगवेगळ्या शाळांतील मतदान केंद्रांवर गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला. निगडीतील प्रभाग क्रमांक १५ मधील कॅम्प एज्युकेशन शाळेत मतदारांना वेगवेगळ्या केंद्रांवर नाव शोधत फिरावे लागत असल्याने अनेक मतदार मतदान न करता परत जात असल्याचे चित्र होते. काळेवाडी येथे अनेक मतदारांची नावे सापडत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या.

प्रमुख तक्रारी...
- मतदार यादीत नाव असूनही स्लिपवरील अनुक्रमांक वेगळे.
- पक्षांकडून दिलेल्या स्लीपवरील अनुक्रमांक व प्रत्यक्ष यादीतील क्रमांक जुळले नाहीत.
- प्रभाग क्रमांक २७ मधील काही नागरिकांचे मतदान प्रभाग २२ मध्ये, तर प्रभाग २२ मधील काही मतदारांचे मतदान प्रभाग २७ मध्ये गेले असल्याचेही प्रकार.
- एका घरातील सदस्यांचे मतदान वेगवेगळ्या प्रभागांत गेल्याने मतदारांत संभ्रम.

दोन केंद्रांची नावे एकच
प्रभाग क्रमांक २४ मधील गणेशनगर आणि मंगलनगर येथील कांतीलाल खिंवसरा शाळेतील दोन मतदान केंद्रांमुळेही मतदारांचा मोठा घोळ झाला. केंद्रांचे नाव एकच असल्याने मतदारांना योग्य केंद्र शोधण्यात विलंब झाला. कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट माहिती न मिळाल्याने मतदारांना एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर पाठविण्यात आले. विशेषतः महिला मतदारांना वाकड - मंगलनगर येथून पुन्हा गणेशनगर येथील केंद्रावर जावे लागल्याने मोठी गैरसोय झाली.

सोसायटीधारकांची नाराजी
यापूर्वी आपल्‍या परिसरातच मतदान केंद्राची सोय असल्‍याचे सांगत यंदा मतदान केंद्र तीन ते चार किलोमीटर लांब असल्‍याने चऱ्होली, वडमुखवाडी, जाधववाडीतील सोसायट्यांमधील सदस्यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. त्‍यामुळे त्यांच्याकडून सकाळी आणि दुपारच्‍या टप्‍प्‍यात मतदानाला अल्‍प प्रतिसाद मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT