पिंपरी-चिंचवड

गैरसोयींचा सामना करत मतदान

CD

‘ड’ क्षेत्रीय कार्यालय

पिंपरी, ता. १५ : सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. कामानिमित्त लवकर घराबाहेर पडणाऱ्यांनी सकाळच्या उत्साहपूर्ण वातावरणात मतदान केले. प्रभाग २५, २६, २७ आणि २८ मधील मतदान केंद्रांवर सकाळी दहा ते बारापर्यंत सुरळीत मतदान झाले. दुपारी बारा ते अडीनंतर पुन्हा मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली.

प्रभाग २५ (वाकड-पुनावळे-ताथवडे) मध्ये दहानंतर मतदारांच्या रांगा लागल्या. ताथवडे येथील नृसिंह विद्यालयातील मतदान केंद्रात वीज पुरवठा खंडीत झाल्याने मतदारांना काही मिनिटे थांबावे लागले. जनरेटर सुरू केल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया पूर्ववत झाली. जिल्हा परिषद शाळा, पुनावळे येथील अनुसाई ओव्हाळ व इतर खासगी शाळेतील मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. वाकड येथील एसएनबीपी मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचे आढळले. गावठाणातील मनपा शाळेत केंद्रासाठी वाहनतळ नव्हते. परिसरात कोंडी झाली. यादीत नाव सापडत नसल्यामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली.

प्रभाग २६ मधील (विशालनगर-पिंपळे निलख-कस्पटे वस्ती) मारुती गेणू कस्पटे शाळेतील मतदान केंद्रावर दुपारी शुकशुकाट होता. सायंकाळी गर्दी झाली. वाकड मधील युरो स्कूल येथील केंद्रावर व्हीलचेअर नव्हती. ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना प्रतिक्षा करावी लागली. दिव्यांग नागरिकांना घेऊन जातोय असे दाखवण्यासाठी काही पोलिस कर्मचरी व्हीलचेअरला हात लावून फोटो काढत होते. विशालनगर, पिंपळे निलख येथील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी आणि दुपारी मतदारांची गर्दी होती. प्रभाग २७ (रहाटणी-काळेवाडी तापकीरनगर) रहाटणी गावठाण चौकातील मनपा शाळेत मतदारांची गैरसोय झाली. दुपारी तीननंतर गर्दी झाल्याने दाटीवाटीत मतदारांना थांबावे लागले. प्रभाग २८ (पिंपळे सौदागर-रहाटणी) मध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण झाला.


मतदारांची गैरसोय
- सहा मतदान केंद्रासाठी एकच व्हीलचेअर, दिव्यांग-ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय
- अनिष कुमार यांच्या नावापुढे मतदान केल्याची नोंद, ते नाराज होऊन निघून गेले
- ३१ जुलै २०२५ नंतर नोंदणी केलेल्या मतदारांना माहिती दिली जात नव्हती

PNE26V86089

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

SCROLL FOR NEXT