पिंपरी-चिंचवड

प्रादेशिक पासपोर्ट विभागाच्‍या ‘ओपन हाउस’ला मोठा प्रतिसाद

CD

पिंपरी, ता. १५ : प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) विभागाच्यावतीने दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी राबविण्यात येत असलेल्या ‘ओपन हाउस’ संकल्पनेस पिंपरीत नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामधून नागरिकांच्या पारपत्रासंबंधी तक्रारी थेट ऐकून त्यावर तत्काळ तोडगा काढला जात आहे.
या उपक्रमाला प्रादेशिक पारपत्र अधिकारी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, कागदपत्रांतील त्रुटी, पोलिस पडताळणीतील विलंब, पारपत्र नूतनीकरण तसेच इतर तांत्रिक बाबींवर तातडीने मार्गदर्शन करण्यात केले जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी जागेवरच निकाली निघत असल्याचे दिसून येत आहे. त्याने मध्यस्थांमार्फत (एजंट) होणारी फसवणूक आणि अतिरिक्त आर्थिक भुर्दंड टाळण्यासही मदत होत आहे.
या संकल्पनेमुळे विभाग व नागरिक यांच्यातील संवाद अधिक पारदर्शक आणि सुलभ झाल्याचेही स्पष्ट होत आहे. पुणे प्रादेशिक पारपत्र विभागाच्या कार्यक्षेत्रात पुणे, अहिल्यानगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशीव, परभणी, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या बारा जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांतून दर महिन्याला मोठ्या संख्येने नागरिक ओपन हाउससाठी उपस्थित राहत आहेत.
अर्जदार नागरिकांनी थेट विभागाशी संपर्क साधावा. मध्यस्थांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन प्रादेशिक पारपत्र अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT