पिंपरी-चिंचवड

विश्‍लेषण - क क्षेत्रिय कार्यालय

CD

क क्षेत्रिय कार्यालय

भाजपने राखला भोसरीचा गड

प्रभाग क्रमांक सहामध्ये २०१७ चाच ‘पॅटर्न’; मडिगेरी यांचा पराभव

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ ः भोसरीतील प्रभाग क्रमांक सहामध्ये २०१७ चाच ‘पॅटर्न’ पुन्हा दिसून आला. या प्रभागात २०१७ प्रमाणेच रवी लांडगे बिनविरोध आले आहेत. चुरशीची ठरलेल्‍या लढाईत भाजपच्या नवखे उमेदवार डॉ. सुहास कांबळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मातब्बर उमेदवार सीमा सावळे यांनी चितपट केले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुषार सहाणे यांनी भाजपचे माजी नगरसेवक विलास मडिगेरी यांचा केलेला पराभव चर्चेचा विषय ठरला आहे. तर उर्वरित भाजपचेच उमेदवारही विजयी झाल्यामुळे पुन्हा एकदा हा भाजपचा गड असल्याचे सिद्ध झाले.

प्रभाग २ मध्ये जागा ‘अ’ मध्ये सुजाता बोराटे आणि रुपाली आल्हाट यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. बोराटे यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी टिकवून ठेवली आणि एकूण २४,९९० मते मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. आल्हाट यांनीही कडवी झुंज देत १९, ५९४ मते मिळवली, मात्र त्यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली. जागा ‘ब’ मध्ये राष्ट्रवादीच्या अश्‍विनी जाधव यांना २०,५२६ मते मिळाली, पण भाजपच्‍या सारिका बोऱ्हाडे यांनी २३,८०० मते मिळवून ३,२७४ मतांनी पराभूत केले. जागा ‘क’ मधील भाजपचे माजी महापौर राहुल जाधव यांना २२,३०५ मिळाली. त्यांना राष्ट्रवादीचे विशाल आहेर यांनी १८,४८४ मत मिळवून कडवी झुंज दिली. जागा ‘ड’मध्ये वसंत बोराटे यांनी २१,४४८ मते घेत मोठी आघाडी घेतली होती, परंतु शेवटच्या काही फेऱ्यात निखिल बोऱ्हाडे यांनी २२,८५१ मते मिळवून या प्रभागात स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे.

प्रभाग क्रमांक आठमध्ये
भोसरीतील प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजपचे दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले. या प्रभागात गेल्या निवडणुकीत तुषार सहाणेंचा अवघ्या ३९७ मतांनी पराभव झाला होता. असे असतानाही संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सहाणे यांनी प्रभागात नागरी समस्या सोडवत संपर्क कायम ठेवला होता. याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. माजी नगरसेवक संजय वाबळे यांनीही त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून समस्या सोडविला. इंद्रायणीनगरातील गट ‘अ’ हा अनुसुचित जातीतील सर्वसाधारण उमेदवारांसाठी असल्याने या गटात उभे राहिलेल्या अधिक उमेदवारांमुळे मतांचे विभाजन झाले. याचा फटका सीमा सावळे यांना बसल्याचे दिसते. नियोजनबद्ध प्रचार करून मातब्बर तीन वेळा विजय असलेल्या सीमा सावळे यांना पराभूत करून ‘डार्क हॉर्स’ ठरले.

प्रभाग क्रमांक नऊ
प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरण पाहता या प्रभागात पूर्वी राष्ट्रवादी पक्षांचे ‘पॅनेल’ निवडून आलेले आहे. या प्रभागात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी सामना पाहण्यास मिळाला. जागा ‘अ’ सिद्धार्थ बनसोडे यांनी १५,४७८ मते मिळवली. भाजपच्या कमलेश वाळके यांनी १२२२६ यांनी मते मिळवित कडवी झुंज दिली. कॉंग्रेसच्या ॲड. उमेश खंदारे यांना १५२५ मतांवर समाधान मानावे लागले. जागा ‘ब’ मध्ये भाजपच्या मीनाज इनामदार यांनी ११४९४ मते मिळवली खरी, पण माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी १६५१२ मते मिळविल्याबद्दल इतर तग धरू शकले नाही. जागा ‘क’मध्ये सख्ख्या ‘जाऊबाई’ असलेल्या राष्ट्रवादीच्या सारिका मासुळकर आणि भाजपच्या शितल मासुळकर यांच्यात ‘काटे की टक्कर’ झाली. या चुरशीच्या लढतीमध्ये सारिका यांनी १५५२३ मते मिळविल्यामुळे भाजपच्या शीतल यांना ११९४० मतांवर समाधान मानावे लागले. जागा ‘ड’मध्ये राष्ट्रवादीचे राहुल भोसले यांना १८२९५ मते प्राप्त केल्यामुळे भाजपचे सदगुरु कदम ११०४१ मत मिळाल्‍यामुळे पराभव चाखावा लागला.

- माजी नगरसेवक विलास मडिगेरी यांना मुलाच्या उमेदवारीचाही फटका
- प्रभाग क्रमांक सहामध्ये २०१७ चाच ‘पॅटर्न’ पुन्हा दिसून
- पुन्हा एकदा हा भाजपचा गड
- प्रभाग क्रमांक आठ मध्ये ‘उच्चशिक्षित पॅनेल’
- मातब्बर तीन वेळा विजय असलेल्या सीमा सावळे यांना पराभूत
- डॉ. सुहास कांबळे ठरले ‘डार्क हॉर्स’
- पराभूत उमेदवार सीमा सावळे यांनी पुर्नमोजणीसाठी अर्जाची मागणी केली

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT