पिंपरी-चिंचवड

‘पुणे ग्रँड टूर’चे वाजत-गाजत स्वागत होणार

CD

सोमाटणे, ता.१८ ः पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या स्वागतासाठी स्पर्धा मार्गावरील गावे सज्ज झाली असून स्पर्धा मार्गावर सडारांगोळ्या काढून, ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात जेसीबीतून पुष्पवर्षाव करत खेळाडूंचे स्वागत केले जाणार आहे.
‘पुणे ग्रॅंड टूर २०२६’ मधील ४० देशांतील सुमारे १७६ सायकलपटू २० जानेवारीला मुळशी तालुक्यातील कासारसाई गावातून पवनमावळातील चांदखेड येथे प्रवेश करणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रशासनाबरोबर स्पर्धा मार्गावरील सर्व गावांतील ग्रामस्थांच्यावतीने गाव साफसफाई, अंतर्गत रस्ते स्वच्छता, गावातील मैदान, शासकीय कार्यालये परिसर यांची स्वच्छतेची कामे आज अखेर पूर्ण झाली आहेत. सांडपाणी व्यवस्थापन, स्वागतकक्ष उभारणी, स्वागत फलक यांची कामेही पूर्ण झाली आहेत.
कासारसाई, चांदखेड, आढले, डोणे येथे गावाच्या मुख्य प्रवेशद्वार व स्पर्धा मार्गावर स्वागत फलक लावण्यात आले आहेत. कासारसाई येथे सरपंच प्रियांका गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला, सामाजिक संस्था यांच्यावतीने ढोल, ताशा, लेझीमच्या गजरात स्वागत होणार आहे. चांदखेड येथे सरपंच मीना माळी यांच्यासह ग्रामस्थ, महिला, सामाजिक संस्था, गणेश मंडळ, तरुण मंडळ यांची स्वागत तयारी पूर्ण झाली असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशा, लेझीम- झांज पथक, महिलांचे तिरंगा पथक यांची संचलनाची तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धेच्या दिवशी गावातील सर्व व्यवहार, दुकाने, जनावरांचे गोठे बंद ठेवण्यात येणार असून ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने चहा, नाष्टा, पाणी यांची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच मीना माळी यांनी दिली.
आढले येथील गाव स्वच्छता, रस्ते स्वच्छता, स्वागत कमानी, स्वागत फ्लेक्स लावणे ही सर्व कामे पूर्ण झाली असून स्पर्धेच्या दिवशी खेळाडूंच्या स्वागतासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, महिला, पोलिस मित्र संघटना हातात तिरंगा घेऊन सहभागी होणार आहेत. स्पर्धकावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करणार असून स्पर्धा मार्ग व गावातील रस्त्यावर सडारांगोळ्या काढल्या जाणार आहेत. पिण्याचे पाणी, नाष्टा यांची सोय केली जाणार असल्याची माहिती सरपंच मच्छिंद्र म्हस्के व नितीन घोटकुले यांनी दिली.

Mumbai: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! दादर ते जेएनपीटी नवा मार्ग सुरू होणार; लोकलला मोठा दिलासा, पण कधीपासून?

IND vs NZ, 3rd ODI: डॅरिल मिशेल-ग्लेन फिलिप्सचा शतकी दणका! भारतासमोर 'करो वा मरो' सामन्यात न्यूझीलंडने ठेवलं मोठं लक्ष्य

अमिर खानच्या लेकासोबत साई पल्लवी स्क्रीन शेअर करणार, 'एक दिन' सिनेमाचा टीझरमधून वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेला महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, राजकीय हालचाली सुरू

AI Prank: ‘एआय’ इमेजचा विखारी प्रँक, बनावट अजगरामुळे टेन्शन वाढलं; मुंबईत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT