पिंपरी-चिंचवड

पालक आणि शिक्षकांच्या प्रतिक्रिया

CD

पालकांच्या प्रतिक्रिया

मुलांमध्ये चित्रकला स्पर्धेचा उत्साह होता. मुलांनी घरी आल्यावर स्पर्धेबद्दल आनंदाने सांगितले. वर्षातून एकदा ही स्पर्धा भरविण्याऐवजी तीन महिन्यातून एकदा स्पर्धा आयोजित करावी.
- ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी, पालक, तळवडे

या स्पर्धेमुळे आमच्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. अशा स्पर्धांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, सर्जनशीलता विकसित होते आणि मोबाईल-टीव्हीपासून दूर राहून काहीतरी नवीन शिकायला मिळते. अशा उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार.
- नीलेश कडलग, पालक, दापोडी  

विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील कल्पना व विचार मांडण्यासाठी तसेच त्यांना व्यक्त होण्यासाठी हे अतिशय चांगले व्यासपीठ आहे. या स्पर्धेमुळे मिळालेल्या संधीचा लाभ मुळे घेत आहेत. चित्रकलेचे विषय नवीन व चांगले आहेत. विचार करायला लावत आहेत. चित्रे रंगविताना मुलांचे देहभान हरपून गेले होते.
- सविता कडलग, पालक
-------
कला शिक्षकांच्या प्रतिक्रिया

चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आहे. ‘सकाळ’चा हा उपक्रम खूप चांगला आहे. नियोजन देखील उत्तम आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा एक तासात चित्र काढून रंगवताना कस लागतो.
- शकुर अकबर मुलानी, मनपा शाळा, तळवडे

गेली अनेक वर्षे ‘सकाळ’ची चित्रकला स्पर्धा नियमित सुरू आहे. ही स्पर्धा लहानग्यांचे आकर्षण आहे. ही स्पर्धा कधी सुरु होईल आणि आम्ही बक्षिसे जिंकू अशी प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना असते. विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला त्यातून विशेष वाव मिळतो. आपण चित्रकार असल्याचा आत्मविश्वास निर्माण होऊ लागतो. कलात्मक संकल्पना रुजते.
- रमेश गाढवे, एच. ए. स्कूल, पिंपरी

विद्यार्थांच्या कलागुणांना सादर करण्यासाठी या स्पर्धेचे खुले व्यासपीठ मिळते. त्यात आमची मुले आनंदाने सहभागी होऊन त्यांची स्वप्ने रंगवतात याचा मला खूप आनंद होतो. चित्रकला स्पर्धा सर्वांसाठी खुली ठेवल्याबद्दल आयोजकांचे आभार मानते. दिव्यांग विद्यार्थ्यांनाही चित्रकला स्पर्धेचा आनंद घेता आला याचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो.
- स्नेहल झांबरे, चिंचवड
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT