पिंपरी, ता. १८ ः राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, पुणे जिल्हाध्यक्षपदी मारुती रामभाऊ शिंदे, तर सरचिटणीसपदी पै. महेश घुले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र दशरथ अभंगराव यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा केली.
संघटनेच्या प्रत्येक पदासाठी एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडले गेले. कार्याध्यक्षपदी दीपक चव्हाण, कोषाध्यक्षपदी विजय लांघे, कार्यालयीन सचिवपदी सोमनाथ जाधव, सहकोषाध्यक्षपदी अविनाश तळेकर, तर संघटकपदी भाग्यशाली लोखंडे व एस. व्ही. सानप, उपाध्यक्षपदी दिनेश कुचेकर, कृष्णा साळवी, नंदकिशोर भरेकर, सदानंद मोरडे यांची निवड झाली. प्रसिद्धी प्रमुखपदी प्रशांत आवळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘आरएनपीएस’ पेन्शन योजना प्रभावीपणे लागू करावी, सर्व विभागांतील रिक्त पदे सरळसेवेने तातडीने भरावीत , शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सरळसेवेने भरती करावी आदींसह कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबत शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.