पिंपरी-चिंचवड

कोट्यवधी खर्चूनही औषधांचा तुटवडा

CD

पिंपरी, ता. १९ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने चालू आर्थिक वर्षात अत्यावश्यक औषधांच्या खरेदीसाठी तब्बल तीन कोटी रुपयांची निविदा मंजूर केली आहे. शहरातील वायसीएमसह आठही रुग्णालये आणि ३३ नागरी दवाखान्यांमध्ये मोफत औषधोपचार देण्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक दवाखान्यांत रक्तदाब, मधुमेह, दमा आणि काही अँटिबायोटिक्सची औषधे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. परिणामी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही खासगी मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची वेळ येत असल्याचे वास्तव आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत मध्यवर्ती औषध भांडारातून सर्व रुग्णालये व नागरी दवाखान्यांना औषधांचा पुरवठा केला जातो. महापालिकेच्या निविदेनुसार ३७ प्रकारच्या अत्यावश्यक औषधांची खरेदी करण्यात आली असून, त्यामध्ये दमा, मानसिक आरोग्य, संसर्गजन्य आजार, वेदनाशामक तसेच दीर्घकालीन उपचारांवरील लाखो गोळ्यांचा समावेश आहे. कागदोपत्री साठा भरपूर असतानाही स्थानिक पातळीवर औषधे उपलब्ध नसल्यामुळे पुरवठा साखळीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

रुग्णांची वाढती परवड
वायसीएम, जिजामाता, भोसरी, आकुर्डी, थेरगाव, भोसरी आणि इतर नागरी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी औषध लिहून दिल्यानंतर फार्मसीमध्ये ‘स्टॉक संपला’ असे उत्तर मिळते. काहींना दोन-तीन औषधांपैकी एकच औषध दिले जाते, तर उर्वरित औषधे बाहेरून घेण्यास सांगितले जाते. मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांना दर महिन्याला ३०० ते ८०० रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याची तक्रार आहे. ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणावर महापालिकेच्या दवाखान्यांवर अवलंबून आहेत. मोफत उपचाराची योजना असताना औषधांसाठी खिशाला कात्री लावावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पुरवठा कुठे अडकतो?
आरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, मध्यवर्ती औषध भांडारात औषधांचा साठा उपलब्ध असला तरी सर्व दवाखान्यांपर्यंत वेळेत वितरण होणे हे मोठे आव्हान ठरत आहे. काही औषधांचा पुरवठा टप्प्याटप्प्याने होत असल्याने दवाखान्यांमध्ये तात्पुरता ‘स्टॉक आउट’ निर्माण होतो. परिणामी डॉक्टरांकडे औषध लिहिण्याशिवाय पर्याय राहत नाही, तर रुग्णांना बाहेरून खरेदी करावी लागते.

दवाखानानिहाय साठा गुप्त का?
महापालिकेकडे औषध वितरणासाठी स्वतंत्र केंद्रीय व्यवस्था असतानाही प्रत्येक दवाखान्यातील उपलब्ध साठा, स्टॉक आउटची नोंद आणि औषध वितरणाचा तपशील सार्वजनिक पोर्टलवर उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्या दवाखान्यात कोणती औषधे उपलब्ध आहेत, याची माहिती रुग्णांना मिळत नाही. नागरिक संघटनांनी दवाखानानिहाय औषध साठा ऑनलाइन प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.

मला रक्तदाब आहे. मी महापालिकेच्याच दवाखान्यातून गोळ्या आणत असतो. मात्र, मागील काही महिन्यांपासून निम्माच गोळ्या दिल्या जातात. तर काही वेळा संपल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाइलाजास्तव खासगी रुग्णालयातून गोळ्या खरेदी कराव्या लागतात.
- विठ्ठल पाटील, ज्येष्ठ नागरिक, भोसरी

महापालिकेच्या दवाखान्यात जवळपास सर्वच गोळ्यांचा साठा आहे. मधुमेह आणि रक्तदाबांच्या काही गोळ्या राज्य शासनाकडूनच आलेल्या नाहीत. त्यामुळे काही गोळ्यांचा स्टॉक कमी आहे. त्यातच काही गोळ्या या एकत्रित न घेता वेगवेगळ्या घ्याव्या लागतात. त्यातील एक गोळी उपलब्ध नसेल तर दुसरी गोळी देता येत नाही.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Superstition Law: बुवाबाजीला आळा घालणार कसा? जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १३ वर्षे, नियम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष

IND vs SL 2nd Test: मोठा धक्का! दुसऱ्या कसोटीतून तीन प्रमुख खेळाडूंची माघार; आता WTC Final मध्ये पोहोचणार कसे?

Maharashtra Education: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक स्थिती! नववी-दहावीत ९ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य; एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर पुन्हा भाजपला डिवचले

Kupwad MIDC Two dead Shock : सांगलीत क्रेनचा विद्युतवाहिनीला धक्का; दोघांचा जागीच मृत्यू, कुपवाड एमआयडीसीतील घटना

SCROLL FOR NEXT