पिंपरी-चिंचवड

साळुंब्रेत माहेरवाशिणी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

सोमाटणे, ता. १९ ः साळुंब्रे येथे नवविवाहितांचा तिसावा माहेरवाशीण मेळावा उत्साही वातावरणात पार पडला. नवीन विवाह झालेल्या मुलींच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, शाळेने केलेल्या संस्काराची जपणूक व्हावी, त्यांच्या हातून सासरच्या माणसांबरोबर समाजाची सेवा व्हावी, त्यांच्यात अडचणींवर मात करण्याची क्षमता वाढावी, विवाहितामध्ये नवीन उद्योग व्यावसायासाठी विचारांची एकमेकांत देवाणघेवाण व्हावी, त्यांनी नव्याने उद्योग व्यवसायाकडे वळावे आदी उद्देशाने तीन दशकापूर्वी साळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालयाच्या वतीने प्राचार्य व्यंकटराव भताने यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याची सुरुवात झाली. दरवर्षी हा माहेरवाशीण मेळावा नागपंचमी सणाच्या दुसऱ्या दिवशी होतो. या मेळाव्याची सांगता नवविवाहितांची खणा नारळाने ओटी भरून सासरी जाण्यासाठी त्यांना निरोप देऊन केली जाते.
मेळाव्यात साळुंब्रे, सोमाटणे, गहुंजे, शिरगाव, गोडुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे, कासारसाई येथील नवविवाहितांसह या शाळेत यापूर्वी दहावीत तीन दशकात शिक्षण घेतलेल्या सर्व महिला सहभागी झाल्या. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या दीपाली हुलावळे, रेखा भागवत, उज्वला भेग
डे, नंदा आगळे आदी उपस्थित होत्या. संस्थेचे कार्यवाह व्यंकटराव भताने, मुख्याध्यापक राजेंद्र लासूरकर, गणेश भताने यांनी मार्गदर्शन केले.
PNE26W43381

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT