पिंपरी-चिंचवड

पीयूसी शुल्कात २० टक्के वाढ

CD

पिंपरी, ता. १९ ः परिवहन विभागाने ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र’(पीयूसी) शुल्कात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. १८) पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून आता दुचाकीसाठी ६०, तीन चाकीसाठी १२० आणि चारचाकीसाठी १५० रुपये मोजावे लागणार आहे.
वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूला लगाम लावण्यासाठी सर्व वाहनांना पीयूसी बंधनकारक आहे. एकदा पीयूसी काढल्यानंतर बीएस-३ वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची वैधता सहा महिन्यांची आहे, तर बीएस-४ आणि बीएस-६ वाहनांच्या प्रमाणपत्राची वैधता एक वर्षापर्यंत असते. त्यामुळे सहा किंवा १२ महिन्यांनंतर पुन्हा पीयूसी काढावी लागते. परिवहन विभागाने यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये दरवाढ केली होती. दुचाकीचे ३५ वरून ५० रुपये, पेट्रोल तीन चाकी वाहनाचे ७० वरून १०० रुपये, पेट्रोल/सीएनजी/एलपीजी चारचाकी वाहनाचे ९० वरून १२५ रुपये आणि डिझेलवर चालणारे वाहनांचे ११० रुपयांवरून १५० रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. पण, दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पण, पीयूसीचे शुल्क गेल्या चार वर्षांपासून तेवढेच आहेत. त्यामुळे शुल्कात वाढ करण्याची मागणी ‘महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशन यांनी केली होती. त्याला अनुसरून परिवहन विभागाने त्रिसदस्यीय समिती गठित केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार पीयूसी शुल्कात वाढ करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून नवीन दर १८ ऑगस्ट पासून लागू झाले आहेत.

बोगस प्रमाणपत्रांना आळा कधी बसणार?
पीयूसी शुल्कात दर वाढ झाली, पण बोगस पीयूसी प्रमाणपत्रावर आळा प्रशासन कधी घालणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आजही वाहनांच्या फोटो वरून पीयूसी देने, सीएमव्हीआर ११५ नुसार जी तपासणी पद्धत अवलंबली पाहिजे तिला बोगस सॉफ्टवेअर वापरून बायपास करण्याचे प्रकार सुरुच आहेत. सर्व केंद्रांचे टेक्निकल ऑडिट होणे गरजेचे आहे, त्याच बरोबर सेंटर ना दिलेली मान्यता एसओपीच्या नुसार झाली आहे का? व ते त्या नियमाचे पालन करतात का? याची फेर तपासणी प्रशासनाने पुन्हा करावी अशी मागणी काही केंद्र चालकांनी केली आहे.

जूने दर ः नवीन दर
दूचाकी ः ५० ः ६०
पेट्रोलवरील तीनचाकी ः १०० ः १२०
पेट्रोल/सीएनजी/एलपीजीवर चालणारे चारचाकी ः १२५ ः १५०
डिझेलवर चालणारे वाहन ः १५० ः १८०

पीयूसी शुल्कात वाढ केली त्याचे स्वागत आहे. पण त्या पेक्षा ही अंमलबजावणी वर भर द्यावा. त्या सोबत जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी योजना राबवाव्यात. जेणे करून पीयूसी सिस्टीमचा सर्वांगीण विकास व जनतेचाही फायदा होईल.
- शैलेंद्र कांबळे, पीयूसी केंद्र चालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Superstition Law: बुवाबाजीला आळा घालणार कसा? जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १३ वर्षे, नियम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष

IND vs SL 2nd Test: मोठा धक्का! दुसऱ्या कसोटीतून तीन प्रमुख खेळाडूंची माघार; आता WTC Final मध्ये पोहोचणार कसे?

Maharashtra Education: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक स्थिती! नववी-दहावीत ९ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य; एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर पुन्हा भाजपला डिवचले

Kupwad MIDC Two dead Shock : सांगलीत क्रेनचा विद्युतवाहिनीला धक्का; दोघांचा जागीच मृत्यू, कुपवाड एमआयडीसीतील घटना

SCROLL FOR NEXT