पिंपरी-चिंचवड

कामगार मृत्यूप्रकरणी गुन्ह्याऐवजी केवळ नोटिस

CD

पिंपरी, ता. १९ : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाने नमूद केले आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ कारणे दाखवा नोटिस बजावून २४ तासांत खुलासा मागविण्यात आला आहे.
महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीवर स्वातंत्र्य दिनानिमित्त लावलेल्या विद्युत रोषणाईच्या माळा काढताना पाय घसरून राहुल विठ्ठल साबळे (वय ४३) या कामगाराचा मृत्यू झाला. महापालिकेच्या विद्युत विभागाने मे. पार्वती इलेक्ट्रिकल एंटरप्रायझेस या एजन्सीला विविध कार्यक्रमांसाठी विद्युत रोषणाई करण्याचे काम दिले आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे कामही संबंधित एजन्सीमार्फत सुरू होते.
या दुर्घटनेनंतर महापालिकेने बजावलेल्या नोटिशीमध्ये संबंधित एजन्सीच्या कामकाजावर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने न देता तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता काम करून घेतल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. उंच ठिकाणी काम करताना कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे ही ठेकेदाराची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.


कामगाराचा जीव गेल्यानंतर महापालिकेने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर ठेकेदाराला नोटिस बजावून २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा समाधानकारक नसल्यास निविदेतील अटी व शर्तीनुसार कडक कारवाई करण्यात येईल.
- महेश कावळे, सहशहर अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT