पिंपरी-चिंचवड

डेअरी फार्म उड्डाणपूल रखडल्याने ठेकेदाराला नोटीस

CD

पिंपरी, ता. १९ : डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मे. टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड या ठेकेदाराला अंतिम ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली आहे. यासोबतच कंपनीचा दरवाढीचा लाभ रोखून प्रतिदिन दंड आकारण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी कॅम्प, पिंपळे सौदागर आणि रहाटणीला जोडणारा हा ६५.२८ कोटींचा प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, वारंवार मुदतवाढ देऊनही काम संथ गतीने सुरू असल्याने प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे. उड्डाणपुलाचे काम रखडल्याने आणि सेवा रस्ते बंद असल्याने नागरिकांना दररोज तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
महापालिकेने ठेकेदाराला रेल्वे उड्डाणपुलासह सेवा रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश दिले आहेत. विहित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

सार्वजनिक हिताच्या प्रकल्पात निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. वेळेत काम न पूर्ण केल्यामुळे दंडात्मक कारवाई केली असून, पुढील टप्प्यात कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

विजय भोजने, कार्यकारी अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Superstition Law: बुवाबाजीला आळा घालणार कसा? जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १३ वर्षे, नियम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष

IND vs SL 2nd Test: मोठा धक्का! दुसऱ्या कसोटीतून तीन प्रमुख खेळाडूंची माघार; आता WTC Final मध्ये पोहोचणार कसे?

Maharashtra Education: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक स्थिती! नववी-दहावीत ९ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य; एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर पुन्हा भाजपला डिवचले

Kupwad MIDC Two dead Shock : सांगलीत क्रेनचा विद्युतवाहिनीला धक्का; दोघांचा जागीच मृत्यू, कुपवाड एमआयडीसीतील घटना

SCROLL FOR NEXT