पिंपरी-चिंचवड

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना जपानी, जर्मन भाषेचे धडे

CD

पिंपरी, दि. १९ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) विभागाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना जपानी व जर्मन भाषा शिकवली जाणार आहे. त्यासाठी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांमागे महापालिका १५ ते १७ हजार रुपये शुल्क भरणार आहे.

महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील आयटीआय संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना जपानी व जर्मन भाषा शिकविण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी वार्षिक ३८ लाख रुपयांचा अंदाजपत्रकीय दर सादर केला होता. मे. नालंदा फाउंडेशन दापोडी यांनी मोरवाडी व कासारवाडी येथे जपानी व जर्मन भाषा शिकविण्यासाठी ३२ लाख ४६ हजार ३०० रुपये हा १४.५७ टक्के कमी दर सादर केला. त्यानुसार या संस्थेला हे काम देण्यात येणार आहे.

नालंदा फाउंडेशन संस्थेने आयटीआयमध्ये जपानी व जर्मन भाषा शिकवायची आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर संबंधित भाषेची परीक्षा घेणे, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र देणे तसेच प्रशिक्षणार्थींना परदेशात किंवा भारतात रोजगार मिळेपर्यंत प्लेसमेंट सुविधा देणे अशी जबाबदारी असणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळेपर्यंत किंवा उद्योजक बनण्यासाठी आवश्‍कतेनुसार स्टार्टअप, विविध शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन करणे. अभ्यासक्रमाच्या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांकडे संस्थेने वैयक्तिकरित्या लक्ष देत अभ्यासक्रम व्यवस्थित पार पाडणे. विद्यार्थ्यांची माहिती वेळोवेळी पालक तसेच आयटीआय विभागास पुरविणे आवश्‍यक असणार आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Superstition Law: बुवाबाजीला आळा घालणार कसा? जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १३ वर्षे, नियम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष

IND vs SL 2nd Test: मोठा धक्का! दुसऱ्या कसोटीतून तीन प्रमुख खेळाडूंची माघार; आता WTC Final मध्ये पोहोचणार कसे?

Maharashtra Education: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक स्थिती! नववी-दहावीत ९ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य; एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर पुन्हा भाजपला डिवचले

Kupwad MIDC Two dead Shock : सांगलीत क्रेनचा विद्युतवाहिनीला धक्का; दोघांचा जागीच मृत्यू, कुपवाड एमआयडीसीतील घटना

SCROLL FOR NEXT