पिंपरी-चिंचवड

गुंतवणुकीच्या नावाखाली साडेतीन कोटींची फसवणूक

CD

पिंपरी, ता. २० : ट्रेडिंग, म्युच्युअल फंड आणि एसआयपीमधील गुंतवणुकीवर दरमहा मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून ५३ गुंतवणूकदारांची साडेतीन कोटींची फसवणूक करण्यात आली. ही घटना चाकण, आंबेठाण रोड येथील साईनंदन कन्सल्टन्सी येथे घडली.
या प्रकरणी सतवीर सिंग गोदारा (रा. आंबेठाण रोड, चाकण, मूळ- राजस्थान) यांनी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश शिंदे, ईश्वर हसनाळे, सुरजीत सिंग कुकणा, सुरेंद्र सुथार आणि जितेंद्रकुमार वर्मा (संचालक, साईनंदन कन्सलटंसी प्रा.लि.) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी ट्रेडिंग, म्युच्युअल फंड आणि एसआयपीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून दरमहा ३.५० ते ३.७५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला काही परतावा दिला. मात्र, नंतर मूळ रक्कम व परतावा न देता फिर्यादीचे १५ लाख ६९ हजार आणि इतर ५२ जणांची रक्कम मिळून एकूण सुमारे ३ कोटी ५२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: धावत्या लोकलमध्ये आसनावरून वाद, नंतर धक्काबुक्की अन्... ६२ वर्षीय प्रवाशाला ढकललं; उपचारादरम्यान मृत्यू

J&K High Court Bench: लडाखमध्ये जम्मू-काश्मीर हायकोर्टची बेंच स्थापन होणार! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा

CSMT Ghee Scandal: धक्कादायक! ‘मानवी सेवनासाठी नाही’ असे तूप मोटरमनच्या ताटात; सीएसएमटीतील ‘साई कटर्स’ कॅन्टीन बंद

Marwade Bypass : मरवडे बायपास मागणी आंदोलनात वाहतूक अडथळा; 35 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल, सनदशीर आंदोलनाला शिक्षा?

Latest Marathi News Live Update: बालवडकरांनंतर टिंगरेंचाही निधी घेतला काढून, स्थायी समितीत भाजपाच निर्णय

SCROLL FOR NEXT