इंस्टावरील संपर्काद्वारे पिस्तूल विकणारा अटकेत
पिंपरी, ता. २१ : इंस्टाग्रामवरून ओळख करून पिस्तूल विक्री करणाऱ्या नांदेड येथील एकाला दोन पिस्तूल व दोन काडतुससह पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई भोसरीतील गावजत्रा मैदान येथे करण्यात आली. मंगेश मालू कोकणे (रा. मुगाव, ता. नायगाव, नांदेड) असे या आरोपीचे नाव आहे. नांदेड येथील रहिवासी असलेला एम.के. नावाचा आरोपी हा पिस्तूल विक्री करीत असून तो इंस्टाग्रामद्वारे संपर्क करून पिस्तूल विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे भोसरीतील गावजत्रा मैदान येथून कोकणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख दोन हजार रुपये किमतीचे दोन पिस्तूल व दोन काडतूस जप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.