पिंपरी, ता. १२ : गॅस तुटवड्यामुळे पिंपरी चिंचवड, चाकण, रांजणगाव आणि तळेगाव एमआयडीसी या परिसरांतील कॅन्टीन व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे अनेक कॅन्टीन बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परिणामी, तेथील कामगार आणि कॅन्टीन व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
या औद्योगिक पट्ट्यात सुमारे चार लाख कामगार विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक (सिक्युरिटी गार्ड) यांचाही समावेश आहे. महिला लघुउद्योजक आणि कॅन्टीन व्यावसायिक येथील कंपन्यांना चहा, नाश्ता आणि जेवणाचा पुरवठा करतात. एमआयडीसी परिसरात सुमारे २५० कॅन्टीन कार्यरत आहेत. गॅसची टंचाई असल्यामुळे अनेक कॅन्टीनना कंपन्यांना दोन वेळचा चहापुरवठा करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे कॅन्टीन बंद ठेवण्याची वेळ निर्माण झाली आहे.
गॅस टंचाईमुळे एमआयडीसी परिसरातील कॅन्टीन बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कॅन्टीन सभासदांची लवकरच बैठक बोलावण्यात येणार आहे.
- हर्षवर्धन वळसे पाटील, सचिव, एमआयडीसी कॅन्टीन असोसिएशन
मी गेल्या ३० वर्षांपासून एमआयडीसी परिसरात हॉटेल व्यवसाय करत आहे. आमच्या हॉटेलमधून अनेक कंपन्यांमध्ये चहा, नाश्ता आणि जेवणाचा पुरवठा केला जातो. सध्या गॅस तुटवड्याने अडचणी येत आहेत. ही परिस्थिती कायम राहिली तर आमचा व्यवसाय ठप्प होण्याची भीती आहे.
- रमा बनसोडे, हॉटेल व्यावसायिक
वाहतूक खर्च वाढ आणि गॅसचा तुटवडा यामुळे उद्योग तसेच संबंधित लघुव्यवसाय अडचणीत आहेत. शासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा. लघुउद्योजकांना दिलासा देणाऱ्या योजना जाहीर करावी आणि कामगारांच्या मूलभूत गरजांची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे.
- दुर्गा भोर, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड महिला लघुउद्योग संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.