पिंपरी-चिंचवड

सर्वसाधारण सभा ठरणार बडबडगीत?

CD

पिंपरी, ता. १२ ः महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी रोजी झाली. त्यामध्ये विषय समित्या सदस्यांची निवड केली जाणार होती. मात्र, सभा सुरू होताच शहरातील भटक्या कुत्र्यांसह अन्य विषयांवर ऐनवेळी चर्चा झाली. साधारण चार तासांत ५२ सदस्यांनी म्हणणे मांडले. मात्र, तीन आठवडे उलटूनही सभा वृत्तांत अद्याप नोंद झालेला नाही. त्यामुळे ती सभा केवळ सदस्यांचे बडबडगीत ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेची सभा असो वा स्थायीसह अन्य विषय समित्यांच्या सभांचा वृत्तांत नगररचना विभागाकडून नोंद केला जातो. प्रत्येक सभेचा स्वतंत्र वृत्तांत असतो. महापालिकेचे ते ऐतिहासिक दस्तऐवज ठरते. त्यामध्ये सदस्यांचे बोलणे, त्यावर प्रशासनाची भूमिका मांडणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे, पीठासीन अधिकाऱ्यांचे म्हणणे शब्दंशब्द इतिवृत्त घेतलेले असते. थोडक्यात, सभावृत्तांत हे महापालिकेच्या कामकाजाची कायदेशीर आणि प्रशासकीय विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, चार वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर महापालिका निवडणूक झाली. लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोधी पक्षाची भूमिका स्विकारली. शिवसेनेने गटनेता नियुक्त केला. स्थायी समितीसह विधी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण, क्रीडा- कला- साहित्य- सांस्कृतिक अशा समित्यांवर सदस्य नियुक्ती आणि त्यांतून अध्यक्ष (सभापती) निवड झाली. त्यांचे कामकाजही सुरू झाले. दुसरी सर्वसाधारण सभा अर्थात मार्च महिन्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १३) दुपारी होणार आहे. त्यात पाच विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. तरीही पहिल्या सभेचा अर्थात फेब्रुवारी महिन्यातील सर्वसाधारण सभेचा वृत्तांत अद्याप सार्वजनिकपणे जाहीर केलेला नाही. त्या सभेत विषय समिती सदस्य निवडीचा विषय कार्यपत्रिकेत होता. परंतु, सभा सुरू होताच सदस्यांनी, शहराला भेडसावणारा भटक्या कुत्र्यांचा, त्यांच्या उपद्रवाचा विषय मांडला. त्यांसह अन्य नागरी प्रश्‍नांवर सुमारे चार तास चर्चा झाली. त्यात सुमारे ५२ नगरसदस्यांनी सहभाग घेतला. त्यात उपस्थित झालेले काही प्रश्‍न सोडविण्यास प्रशासनाने प्राधान्यही दिले आहे. कामही सुरू केले आहे. मात्र, सभेचा इतिवृत्तांत अद्याप महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित केलेला नाही. त्यामुळे तो वृत्तांत नोंद होईल की नाही? की केवळ चार तासांचे बडबडगीत ठरेल? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

सभा वृत्तांताचे महत्त्व
महापालिका विषय समिती सभा वृत्तांत (मिनिटस् ऑफ मीटिंग हे स्थानिक प्रशासनातील निर्णय प्रक्रिया, पारदर्शकता आणि कायदेशीर बाबींची नोंद ठेवणारे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज असते. हे वृत्तांत निर्णयांची अधिकृत नोंद, जबाबदारी निश्चिती, भविष्यातील संदर्भासाठी पुरावा आणि नागरिकांना कामकाजाची माहिती पारदर्शकपणे पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण असते.

‘‘महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत नोंदणीचे काम सुरू आहे. अनेक नगरसदस्यांनी सहभाग घेऊन म्हणणे मांडल्याने सभावृत्तांत मोठा आहे. त्यामुळे त्याची नोंद होण्यास विलंब होत आहे.
- मुकेश कोळप, नगरसचिव, महापालिका

वृत्तांताचे महत्त्वाचे पैलू
- निर्णयांची अधिकृत नोंद ः सभागृह अथवा समित्यांमध्ये नगररचना, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण यांसारख्या विषयांवर घेतलेल्या निर्णयांची कायदेशीर दस्तऐवजीकरण म्हणून नोंद केली जाते.
- पारदर्शकता आणि जबाबदारी ः सभांमध्ये कोणत्या सदस्याने काय मत मांडले आणि कोणता ठराव पास झाला, याची नोंद असल्याने प्रशासनात पारदर्शकता राहते.
- पुराव्यासाठी उपयुक्त ः भविष्यात कोणत्याही निर्णयावर वाद निर्माण झाल्यास किंवा कामाचे ऑडिट (लेखापरीक्षण) करताना हे इतिवृत्त अधिकृत पुरावा म्हणून काम करते.
- कायदेशीर अंमलबजावणी ः महापालिकेच्या विविध विकासकामांना मंजुरी देणे आणि त्या योग्य प्रक्रियेद्वारे झाल्याचे सिद्ध करण्यासाठी सभेचा वृत्तांत अनिवार्य आहे.
- आर्थिक नियंत्रण ः विशेषतः स्थायी समितीमध्ये मंजूर केलेला अर्थसंकल्प आणि खर्चाच्या तरतुदींची नोंद याद्वारे ठेवली जाते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT