पिंपरी-चिंचवड

सांगवीत सातव्या दिवशी गणरायाला निरोप

CD

पिंपळे गुरव, ता. २० ः जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरातील गणेशोत्सवाची गणेश विसर्जन मिरवणुकीने रविवारी (ता.२०) सात दिवसांनी सांगता झाली. वेताळ महाराज विसर्जन घाटावर विविध मंडळांच्या तब्बल ९० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीत २८ ते ३५ फुटांपर्यंतच्या भव्य गणेशमूर्तींसह आकर्षक देखावे साकारण्यात आले. कुठे महाकाली, कुठे शिवतांडव, तर कुठे कालियामर्दन आणि नृसिंह अवताराचे पारंपरिक देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरासोबतच डीजेच्या कर्कश आवाजाचा दणदणाटही ऐकू आला.
वेताळ महाराज विसर्जन घाटावर शिवशक्ती मित्र मंडळ, सातपुडा सोसायटी यांचा गणपती दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी सर्वप्रथम विसर्जित करण्यात आला. सिझन ग्रुपचा ‘सांगवीचा राजा’ पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीत सहभागी झाला. या मंडळाने २५ फुटांची नृसिंहाची भव्य मूर्ती साकारली.
बालाजी प्रतिष्ठान यांच्या वतीने महाकालीचा देखावा सादर करण्यात आला. शिवताल ढोल पथक आणि शिवशाही ढोल-ताशा पथकांचा मिरवणुकीत सहभाग राहिला. जिवंत देखाव्यात महाकाली आणि रक्तबीज यांच्यातील युद्ध प्रसंग साकारण्यात आला. तो भाविकांचे विशेष आकर्षण ठरला.
हिंदवी सोशल वेल्फेअर ट्रस्टने पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली. तसेच स्वरूपवर्धिनी मंगळवार पेठ पथकाने मलखांबांचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक कला, संस्कृती आणि आधुनिक ध्वनिव्यवस्थेचे मिश्र स्वरूप पाहायला मिळाले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक व्यवस्थेवरही ताण आला.

स्वीडिश पाहुण्यांची भेट
सांगवी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा स्वीडनवरून आलेले परदेशी पाहुणे सर्वांचे आकर्षण ठरले. पुण्यात सोशल वर्कच्या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी आलेल्या या पाहुण्यांनी खास भारतीय पारंपरिक साडी परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी स्थानिक लोकांसोबत तालावर ठेका धरत या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. हा त्यांचा पहिलाच अनुभव होता. पण, येथील उत्साह आणि लोकांचे प्रेम पाहून ते थक्क झाले. भारतीय संस्कृतीची सुरेख झलक दाखवणारा हा क्षण त्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी स्मरणात राहणारा ठरला.

डीजेचे पुन्हा उंच रॅक
जुनी सांगवीतील शिंदेनगर येथे ४ सप्टेंबर रोजी डीजेचा रॅक अंगावर पडून सलमा पठाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अजूनही नागरिकांच्या मनात ताजी असतानाच विसर्जन मिरवणुकीत ३० ते ४० फुटांचे डीजे रॅक उभारण्यात आले. एका कुटुंबातील व्यक्तीचा जीव अशाच धोकादायक रचनेमुळे गेला असताना त्याच परिसरात पुन्हा एवढ्या उंच रॅकचा वापर होताना दिसल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत होती. उत्सवाचा आनंद साजरा करताना मानवी जीविताची किंमत विसरली जाऊ नये, अशी भावना यावेळी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

टोलवादनही सर्रास
पारंपरिक वाद्यांमध्ये टोल वादनावर बंदी असतानाही अनेक मंडळांच्या मिरवणुकीत सर्रास टोल वादन पाहायला मिळाले. एका बाजूला डीजेचा दणदणाट, तर दुसरीकडे टोलच्या कर्णकर्कश आवाजाने ध्वनीची मर्यादा ओलांडल्याचे चित्र दिसून आले. उत्सवातील पारंपरिक जल्लोष आणि ध्वनिप्रदूषण यातील सीमारेषाच पुसट झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

खड्ड्यांचा सामना
जुनी सांगवीतील संविधान चौक ते वेताळ महाराज विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांना तसेच मिरवणुकीतील मंडळांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. खड्ड्यांमुळे मोठ्या मूर्तींची वाहतूक करताना विशेष काळजी घ्यावी लागत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT