पिंपरी-चिंचवड

रुग्णालयात मेडिकलचे आमिष; महिलेची २३ लाखांची फसवणूक

CD

पिंपरी, ता. १२ : एका हॉस्पिटलमध्ये मेडिकलचा व्यवसाय मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका फार्मासिस्ट महिलेची २३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना आयुश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी आणि मोशी येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालय येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विलास वसंत डांगे (रा. रहाटणी), एक महिला आरोपी आणि ॲड. गोविंद पाटील (काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विलास डांगे याने फिर्यादीला त्याच्या मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो, असे आमिष दाखवून परताव्याच्या अटीवर २३ लाख रुपये डिपॉझिट घेतले. मात्र, मेडिकलमध्ये व्यवसाय न झाल्याने फिर्यादीने पैसे परत मागितले असता आरोपीने पैसे परत केले नाही. फिर्यादीच्या बनावट सह्या करून नोटरी गोविंद पाटील यांच्याकडे बनावट सामंजस्याचा करार नोंद केला. त्यावरून आरोपीने हा करार व बनावट सह्या केलेले अर्ज सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यालयात वापर करून फिर्यादीचे लायसन्स सरेंडर करून त्याची पत्नी व फार्मसिस्टच्या नावे नवीन लायसन्स मिळवून पुन्हा व्यवसाय सुरू केला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT