पिंपरी-चिंचवड

जुन्या उर्से टोलनाका परिसरात अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका

CD

सोमाटणे, ता. ५ः जुना उर्से टोलनाका परिसरात पोलिस यंत्रणा नसल्याने द्रुतगती मार्ग परिसर अवजड वाहन चालकांचे विश्रांतीस्थान बनला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जुन्या उर्से टोलनाक्याचे स्थलांतर झाल्यानंतर येथील महामार्ग पोलिसांचे पथकही नवीन टोलनाक्यावर स्थलांतरित झाले. याबरोबरच टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरेही नवीन टोल नाक्यावर हलवण्यात आल्यानंतर, या भागात दंडात्मक कारवाईसाठी कोणीच नसल्याने वाहने उभी करून भर रस्त्यात विश्रांती घेण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. यातील अनेक वाहनचालक गाडीतच झोपतात. यामुळे येथे सकाळी व सायंकाळी वाहनांची संख्या वाढल्याने कोंडी होते. तसेच पुणे बाजूकडून येणाऱ्या वाहनचालकाला रस्त्यात थांबलेले वाहन अचानक दिसल्याने वाहन नियंत्रित करणे शक्य होत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वी अशा प्रकारातून अपघात झाल्याच्या घटना ताज्या असतानाही वाहनचालक याकडे दुर्लक्ष करतात.

नवीन टोलनाक्यावर वाहनचालकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसल्याने वाहनचालक जुना उर्से टोलनाका येथे वाहने थांबवतात, याबाबत रस्तेविकास महामंडळाला पत्रव्यवहार केलेला आहे.
- शिवप्रसाद पवार, सहायक पोलिस निरीक्षक महामार्ग

PNE26V82644

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Gas Shortage : मुंबईच्या चुली विझल्या; गॅस टंचाईने अनेक हॉटेल्स बंद, फूड डिलिव्हरीवरही मोठा परिणाम

Gas Cylinder बूक केलाय? 'या' नंबरवर पाठवा 'हा' मेसेज; एका मिनिटात कळेल कधी होणार डिलिव्हरी, घरबसल्या मिळवा गॅस

The Nation Pays Tribute to Chhatrapati Sambhaji Maharaj on his Martydom Day: छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी देशभरातून श्रद्धांजली; अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

Traffic Jam Viral Post : 23 KM नको, 47 KM च बरं! Google Map चा 'तो' स्क्रीनशॉट पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल; ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी महिलेची भन्नाट आयडिया

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT