पिंपरी-चिंचवड

स्‍वस्‍त धान्‍य दुकानात जानेवारीचे धान्‍य दाखल

CD

पिंपरी, ता. ५ : पिंपरी-चिंचवड शहरातील शिधापत्रिकाधारकांसाठी डिसेंबर महिन्यातील धान्य वाटप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जानेवारी महिन्‍यातील ४० टक्‍के धान्‍य स्‍वस्‍त धान्‍य दुकानात दाखल झाले आहे. लवकरच उर्वरीत धान्‍य पुरवठा केला जाऊन या महिन्यातील धान्य शंभर टक्‍के नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यातील ज्वारीचे वाटप अद्याप शिल्लक असून, त्याबाबत शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याची माहिती अन्नधान्य वितरण व पुरवठा विभागाने दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यातील शिल्‍लक ज्वारीचा कोटा जानेवारीत वाटण्याबाबतचा विषय अद्याप मंजूर झालेला नाही. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही शिल्लक ज्वारी जानेवारी महिन्यात वितरित केली जाणार आहे. त्यामुळे सध्या ज्वारीचे वाटप तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी, शासन निर्णयानंतरच पुढील वाटप केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, जानेवारीसाठी आवश्यक असलेल्या धान्यापैकी सुमारे ४० टक्के धान्य शहरात दाखल झाले असून, उर्वरित धान्य लवकरच दुकानांमध्ये पोचणार असल्याची माहिती शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यातील धान्य वाटप वेळेत सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

नवीन ज्वारी वाटपासाठी स्वतंत्र कोटा येणार नसल्याने सध्या ज्वारीचे वितरण करता येणार नाही. शासनाच्या सूचनेनुसारच पुढील कार्यवाही केली जाईल. शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमार्फतच धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. सध्या ४० टक्‍के धान्‍य जानेवारी महिन्‍यातील दुकानात पोचविण्यात आले आहे.
- प्रशांत खताळ, अन्‍नधान्‍य वितरण व पुरवठा अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Mini Goa: चक्क यूपीतच आहे 'मिनी गोवा'! कॅम्पिंग, जंगल सफारी अन् कैंची धामची शांती; 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT