पिंपरी-चिंचवड

तब्बल तीन तास रेल्वे सेवेचा खोळंबा

CD

पिंपरी, ता. ५ ः देहूरोड ते तळेगावच्या दरम्यान मालगाडीचे इंजिन खराब झाल्यामुळे सोमवारी (ता. ५) पुणे - लोणावळा मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस आणि लोकल सुमारे तीन तास खोळंबल्या. परिणामी, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास दुसरे इंजिन लावून मालगाडी बाजूला केल्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत झाली.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तळेगाव रेल्वे स्थानकाजवळ बंद पडले. त्याचा पुणे-लोणावळा आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या संचलनावर परिणाम झाला. या मार्गावरुन जाणारी दुपारी तीनची लोकल, डेक्कन एक्स्प्रेस, इंदूर एक्स्प्रेस, नागरकोईल एक्स्प्रेस, दुपारी ३.४७ ची तळेगाव लोकल, कोयना एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, सायंकाळी ४.२५ आणि ५.२० ची लोणावळा लोकल देहूरोड ते शिवाजीनगर दरम्यान रेल्वे थांबविण्यात आल्या. पुणे-लोणावळा दरम्यान एक अप आणि एकच डाऊन लाइन असल्यामुळे या सर्व रेल्वे थांबवण्याशिवाय रेल्वे प्रशासनाकडे दुसरा पर्याय नव्हता. लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांना उशीर झाल्यामुळे कामगार, विद्यार्थी आणि प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास उशीर झाला. पुणे-लोणावळा लोकल दुपारी १२ ते ३ पर्यंत बंद आहेत. त्यानंतर धावणारी तीनची पहिली लोकलही मालगाडीच्या इंजिन बिघाडामुळे मध्येच थांबल्यामुळे त्यातील विद्यार्थी आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास लोणावळ्यावरुन दुसरे इंजिन आल्यानंतर मालगाडी बाजूला करुन रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली. तीन तासांनी रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT