पिंपरी-चिंचवड

परकीय आक्रमणाच्या वेळी संतांची भूमिका प्रेरणादायी

CD

सोमाटणे, ता. १२ : ‘देशावरील प्रत्येक परकीय आक्रमणाच्या वेळी संतांची भूमिका प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरली आहे,’ असे प्रतिपादन एकनाथ महाराज सदगीर (ठाणे) यांनी केले.
घोरावडेश्वर पायथा येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात ‘देशाचे संरक्षण आणि संतांचे योगदान’ या विषयावर प्रबोधन करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, मोहम्मद घोरी, अल्लाउद्दीन खिलजी, बाबर, औरंगजेब आदींसह पूर्वी व नंतर झालेल्या विविध परकीय आक्रमणांच्या काळात संतांनी समाजाला जागृत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. राजकर्त्यांना परकीय आक्रमणे परतवून लावण्याची व धर्मरक्षणाची प्रेरणा देण्यात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास स्वामी, जगद्‍गुरु संत तुकाराम महाराज आदी संतांनी प्रेरणा देण्याचे कार्य केले.
प्रत्येक संकटाच्या वेळी संताची भूमिका प्रेरणादायी ठरली असून, भाविकांना पटवून देण्यासाठी त्यांनी अभंगातील दाखले दिले. कुटुंब व देशातील एकता टिकवण्यासाठी संतविचार महत्त्वाचे असून अध्यात्म माणसांना जोडण्याचे कार्य करत आले आहे आणि पुढेही करत राहील. कुटुंब व्यवस्था भक्कम ठेवण्यासाठी अध्यात्माची कास धरणे आवश्यक आहे. कुटुंब संस्था अखंड टिकवण्याचे प्रेरणादायी कार्य केवळ अध्यात्मच करू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे, नगरसेविका ऐश्वर्या तरस, नीलेश तरस, धर्मपाल तंतरपाळे, विजय जगताप, विलास काळोखे आदी उपस्थित होते. तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

PNE26V94934
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT