पिंपरी, ता. १३ : सध्या ‘सोलर टेक्निशियन’ या अभ्यासक्रमाला मोठी मागणी आहे. हे लक्षात घेता कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विद्यार्थिनींसाठी ‘सोलर टेक्निशियन’ प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थिनींना सौर ऊर्जा प्रणालीची स्थापना, तसेच देखभाल-दुरुस्तीसाठीचे तांत्रिक कौशल्य शिकविण्यात येणार आहे.
या संस्थेत यंदापासून नव्याने ‘सोलर टेक्निशियन’ हा एक महिन्याचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यात प्रशिक्षणार्थींना रोज चार तास प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण मोफत असून नोकरी किंवा स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. फक्त मुलींसाठी एक बॅच करत आहेत. १८ ते ३० वर्षांवरील इच्छुक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यासाठी शैक्षणिक अर्हता १० वी उत्तीर्ण असून प्रवेशाकरिता उपलब्ध जागा २५ आहेत. प्रवेश अर्ज करण्याची मुदत २३ फेब्रुवारीपर्यंत आहे.
सौर ऊर्जेचे मूलभूत ज्ञान, सोलर पॅनेलची उभारणी, सोलर पॅनेलची प्रणालींची जोडणी, सोलर पॅनेलची देखभाल, चार्ज कंट्रोलर, इन्व्हर्टर, बॅटरी आणि सौर वॉटर पंपांची माहिती, ग्रीन एनर्जी पद्धती असे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोलर टेक्निशियन व्यवसाय पूर्ण केल्यानंतर स्वतःचे सोलार इंस्टॉलेशन व्यवसाय सुरू करता येतो. तसेच सोलर प्रॉडक्ट डिलरशिप, सोलार मेंटेनन्स सर्व्हिस अशा प्रकाराचे स्वयंरोजगार करता येतो. विद्यार्थ्यांनी खात्रीचा रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन प्राचार्य विभूते यांनी केले आहे.
‘सोलर टेक्निशियन कोर्सला वाढती मागणी लक्षात घेता कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू केले आहे. हे प्रशिक्षण मोफत असून नोकरी किंवा स्वयंरोजगार साठी मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर सोलर पॅनेल इंस्टॉलर, मेंटेनन्स टेक्निशियन किंवा सोलर प्रकल्प इंजिनिअर या पदांवर काम करता येते.
- बसवराज विभूते, प्राचार्य, आयटीआय, कॅम्प एज्युकेशन सोसायटी
PNE26V95342
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.