पिंपरी, ता. १३ ः केंद्र सरकारच्या ‘इंडियन आय मिशन’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या प्रकल्पांतर्गत पिंपरीतील एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने ‘एएसएम एआय फेस्ट २०२६’ची सुरुवात केली आहे. ‘लर्निंग टुडे, लिडिंग टुमारो’ या संकल्पनेवर आधारित एआय फेस्ट २८ फेब्रुवारीपर्यंत एकावेळी १० शाळा, महाविद्यालयांत सुरू राहणार आहे. यात विद्यार्थी, प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग असेल.
एआय फेस्टच्या उद्घाटनप्रसंगी एआय-आधारित ‘डिजिटल ट्विन’ अवताराने दूरस्थ अंतरावर असलेल्या विविध दहा कॅम्पसमध्ये औद्योगिक शिक्षण मंडळाचे (एएसएम) चेअरमन डॉ. संदीप पाचपांडे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘शिक्षणाच्या दैनंदिन प्रक्रियेत अध्यापनापासून प्रशासकीय कामकाजापर्यंत एआयचा समावेश आहे. त्यामुळे एएसएम जागतिकस्तरावरील कुशल एआय मनुष्यबळ निर्माण करेल. या अनोख्या प्रयोगामुळे एआयच्या युगात शैक्षणिक परिवर्तनाच्या नव्या पर्वाची नांदी झाली आहे. प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षणावर भर दिला आहे. शिक्षण, संशोधन, अध्यापन पद्धती आणि संस्थात्मक व्यवस्थापन या सर्वस्तरांवर एआयचा प्रभावी वापर करण्यासाठी ही व्यापक कौशल्य चळवळ उभारली आहे. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन जागतिक दर्जाच्या एआय तज्ज्ञांकडून कार्यशाळांचे आयोजन केले आहे. प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याने ‘एआय फर्स्ट माईंडसेट’ अंगीकारावा, एआयला प्रतिस्पर्धी नव्हे तर सशक्तीकरणाचे साधन समजून कौशल्य कुशलता प्राप्त करणे हा उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.’’
‘‘एआय माणसांची जागा घेईल, अशी भीती व्यक्त केली जाते. मात्र, जे एआयचा योग्य वापर करतील, तेच पुढे जातील. हा महोत्सव आमचे विद्यार्थी आणि शिक्षक यांना यशाच्या बाजूला उभे करेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही एआयच्या वापरातील आव्हाने, कौशल्य विकास आणि माणसांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित संशोधन यावर लक्ष केंद्रित केले आहे. एआय फेस्ट हा दीर्घकालीन उपक्रम आहे.
- डॉ. संदीप पाचपांडे, चेअरमन, औद्योगिक शिक्षण मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.