पिंपरी-चिंचवड

‘एक्काम् अद्वितीयम्’च्या जीवनशैली प्रदर्शनास प्रतिसाद

CD

पिंपरी, ता. १४ ः ‘एक्काम् अद्वितीयम् इव्हेंट्स अँड एक्झिबिशन कंपनी’ने पुण्यातील ‘एनराईज बाय सयाजी’ येथे आयोजित पहिले जीवनशैली प्रदर्शन यशस्वी झाले. यात स्टार्टअप्स, उद्योजक, कलाकार आणि सामाजिक संस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला. केवळ व्यावसायिक नफा न पाहता एका विशिष्ट उद्देशाने प्रेरित व्यासपीठ म्हणून ‘एक्काम्’ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राष्ट्र उभारणीची संकल्पना हे ‘एक्काम् अद्वितीयम्’चे वेगळेपण आहे. स्टार्टअप्सना आधार देणारी, नवीन ब्रँड्सना व्यासपीठ मिळवून देणारी आणि स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देऊन सामाजिक कार्याला गती देणारी चळवळ आहे. सुरत येथील बांधकाम व्यावसायिक रमेश पटेल, वाकडचे नगरसेवक विनायक गायकवाड आणि ममता गायकवाड यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन झाले. दिव्यांग उद्योजकांना आपली कला, सर्जनशीलता आणि कौशल्ये मांडण्याची संधी मिळाली. सक्षमीकरण, समानता आणि सामाजिक एकात्मतेप्रति ‘एक्काम्’ची कटिबद्धता दिसून आली. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ डिझाइनचे विभागप्रमुख डॉ. नामदेव पाटील, साहाय्यक प्राध्यापक अनिकेत सासे यांचा सन्मान केला. ‘इकोसर्व्ह’च्या संस्थापक डॉ. आनंदिता उपस्थिती होत्या. ‘रूट स्किल्स’च्या संस्थापक सुश्री भविषा बुद्धदेव ‘ग्रीन स्किल पार्टनर’ होत्या. व्यवसाय वृद्धी, नावीन्य, सर्वसमावेशकता आणि सामाजिक जबाबदारी या उद्दिष्टांसाठी नीलेश झवेरी, अनुपमा सिंग, पंकजा धोबे आणि पूजा शर्मा यांनी ‘एक्काम् अद्वितीयम्’ची स्थापना केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT