पिंपरी-चिंचवड

चिंचवड टपाल कार्यालयाला एजंटांचा ‘विळखा’

CD

पिंपरी, ता. १५ : चिंचवड टपाल कार्यालयात खासगी एजंटांचा वावर वाढला असून, सामान्य नागरिकांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काहीवेळा ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आवर्ती ठेव (आरडी) जमा करताना खोळंबा, ‘‘लाइट बिल भरण्यासाठी पैसे द्या, नंतर बिल पासबुक घेऊन जा,’’ अशी कामाची पद्धत सुरू झाल्याने ग्राहक त्रस्त आहेत.

टपाल कार्यालयात वीज बिल, फोन बिल, आर.डी. भरून घेण्याची सोय आहे. यासाठी कामांची क्लिष्टता लक्षात घेऊन काही खासगी एजंट म्हणून कार्यरत आहेत. एजंटाकडून आरडी, पीपीएफ, एनएससी आणि किसान विकास पत्र यासारख्या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूकदारांना मदत करतात. त्यातून त्‍यांना कमिशन मिळते. मात्र, या एजंटांचा टपाल कार्यालयात वावर असल्‍याने इतर ग्राहकांना सेवा मिळण्यास अडचण येत आहेत. एजंट हे काउंटरवर पावत्या करत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उन्हात थांबावे लागते.

‘मंथली इन्कम स्कीम’ खाते बंद करण्यासाठी मी टपाल कार्यालयात आले होते. येथील सध्याची जागा अपुरी आहे. येथे एजंटशिवाय इथे कामच होत नाही, असे जाणवते. एजंट व कारकुनांचे संगनमत असल्याचे जाणवते. वैयक्तिकरित्या काम करून घेताना खूप अडचणी येतात. हा एजंटांचा सुळसुळाट कसा थांबविणार? एजंटांना वेगळे काउंटर द्यावे.
- श्रुती धोंगडे, टपाल ग्राहक, रावेत

टपाल कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय काम न होण्याची मानसिकता आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संगनमत आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप यामुळे नागरिकांची पिळवणूक होत आहे. टपाल कार्यालयात इतरांना सेवा कशी मिळणार, हा प्रश्‍न आहे. कामात विलंब टाळण्यासाठी नागरिकांना एजंटांकडे जावे लागत आहे.
- गोविंद गायकवाड, टपाल ग्राहक, विशालनगर, पिंपळे निलख

‘‘नागरिकांच्‍या सेवेसाठी एजंट आहेत. टपाल कार्यालयातील एजंट नागरिकांकडून पैसे घेत नाहीत. नेमके कशामुळे नागरिकांना त्रास होत आहे, याविषयी माहिती घेतो.
- नितीन बने, जनसंपर्क अधिकारी, टपाल कार्यालय, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT