पिंपरी-चिंचवड

तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत प्रेमाचा जल्लोष ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा

CD

पिंपरी, ता. १४ : आपल्या प्रिय व्यक्तीप्रती प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन्स डे’. या प्रेमाच्या दिनानिमित्त आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या उत्सवात तरुण-तरुणींसह ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाल्याचे दिसून आले.
महाविद्यालयीन तरुणाई, नोकरी करणारे युवक-युवती, तसेच विवाहित जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाइन्स डे’चे खास नियोजन केले होते. कोणी टेडी बेअर, फुगे, केक, चॉकलेट्स देऊन आपले प्रेम व्यक्त करताना दिसून आले. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, फुलांची दुकाने आणि रेस्टॉरंट्समध्ये गर्दी वाढली होती.
धावपळीच्या आयुष्यात वेळ काढून एकमेकांसोबत काही क्षण घालवणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि नात्यांना नवी ऊर्जा देणे, यासाठी ‘व्हॅलेंटाइन्स डे’ महत्त्वाचा ठरतो. यानिमित्त शहरांमध्ये हॉटेल्स आणि कॅफेंनी विशेष ऑफर्स जाहीर केल्या होत्या. काही ठिकाणी संगीत मैफिली, कपल गेम्स आणि फोटो कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. तर, काही ठिकाणी जोडपी एकमेकांच्या सहवासात फिरताना दिसले. तसेच ‘ हॅपी व्हॅलेंटाइन्स डे’ असा संदेश लिहिलेले फुगे काही ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होते.

भावनिक नाते अधिक घट्ट
यंदा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला लक्षवेधी ठरलेली बाब अशी, की ज्येष्ठ नागरिकांनीही हा दिवस साजरा केला. काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघटनांनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले. दीर्घ सहजीवनाचा अनुभव घेतलेल्या दाम्पत्यांनी एकमेकांविषयीच्या प्रेमभावना व्यक्त करत हा दिवस संस्मरणीय केला. अशा कार्यक्रमांतून नात्यांमध्ये संवाद वाढतो आणि भावनिक नाते अधिक घट्ट होते. अनेकांनी आपल्या जोडीदाराला छोट्या भेटवस्तू देत किंवा एकत्र वेळ घालवत प्रेम व्यक्त केले. काही ठिकाणी मुलांनी आपल्या आई-वडिलांसाठी खास ‘सरप्राइज प्लॅन’ केले.

समाज माध्यमांवरही ‘व्हॅलेंटाइन डे’ची धूम
इंटरनेटवर म्युझिकल ई-ग्रीटिंग्ज, प्रेमाचा संदेश, वेगवेगळी गाणी असलेले व्हिडिओ उपलब्ध झाल्याने प्रिय व्यक्ती आपल्या सोबत नसली तरीदेखील आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहचवणे सहज शक्य झाले आहे. सध्या या दिवसाशी निगडित अनेक विनोदही व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर फिरत आहेत. एरवी त्या व्यक्तीला कधी एकदा भेटून प्रेम व्यक्त करेन अशी अवस्था असलेले तरुण-तरुणी या मेसेजेस, फोटोज, कोट्समध्ये अडकल्याने प्रेम व्यक्त करण्याची एक नवीन पद्धत रूळताना दिसत आहे.

डच गुलाबाला मागणी
‘व्हॅलेंटाइन्स डे’निमित्त फुलांची दुकाने गुलाबांनी सजविण्यात आली होती. यंदा डच गुलाबाला अपेक्षेपेक्षा अधिक चांगली मागणी राहिली. ‘रोझ डे’पासूनच बाजारातील वातावरण उत्साहपूर्ण होते. फुलांना चांगले दर मिळाल्याने उत्पादक आणि व्यापारी दोघांनाही दिलासा मिळाला आहे. यंदा लाल डच गुलाबाबरोबरच पांढऱ्या गुलाबालाही चांगली मागणी दिसून आली. अनेकांनी पुष्पगुच्छांसाठी तसेच खास सजावटीसाठी पांढऱ्या गुलाबाची निवड केली.

PNE26V95573

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Patil AI: नाद करा पण पाटलाचा कुठं! TCS, Infosys, Wipro शेअर्समध्ये भूकंप; गुंतवणूकदारांचे ₹2.5 लाख कोटींचे नुकसान

T20 WC, IND vs PAK: 'अभिषेक शर्माला खेळवा, कारण आम्हाला...', पाकिस्तानी कर्णधाराचं थेट आव्हान; हँडशेकबद्दलही बोलला

"48 तासांत राहतं घर आणि अकरा गाड्या गमावल्या.." राणादाने सांगितली आयुष्यातील 'ती' अत्यंत वाईट आठवण

Mhada: मुंबईत घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी! म्हाडा ५००० घरांसाठी लॉटरी काढणार; पण कधी? तारीख आली समोर

महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल! खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना काढून टाकणार; एकनाथ शिंदेंचे संकेत, पाहा संभाव्य यादी

SCROLL FOR NEXT