पिंपरी-चिंचवड

तापमान अन् पाण्याच्या मागणीतही वाढ

CD

पिंपरी, ता. १५ : गेल्या दिवसांपासून शहर परिसरात किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. परिणामी, पाण्याची मागणी वाढली असून काही सोसायट्यांमध्ये टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. जलशुद्धीकरण केंद्रांपासून लांबच्या व उंचावरील भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पाणी साठवण्यासाठी ड्रम व टाक्यांची व्यवस्था नागरिकांना करावी लागत आहे.
सर्वांना समप्रमाणात, पुरेशा दाबाने आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. निगडी प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रातून निगडी, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, रावेत, ताथवडे, पुनावळे, किवळे, मामुर्डी, प्राधिकरण आदी भागांत; तर चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून मोशी, चऱ्होली, दिघी, बोपखेल, प्राधिकरण सेक्टर एक ते १३, संतनगर, इंद्रायणीनगर या भागांत पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी अनुक्रमे पवना नदीवरील रावेत बंधारा आणि इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा केला जात आहे. त्यासाठी अनुक्रमे पवना व आंद्रा धरणातून नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. पिंपरी चिंचवडप्रमाणेच नदी काठची गावे व नदीलगतच्या शेतीसाठीही जलउपसा केला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. नदीपात्रातील बाष्पीभवन वाढल्याने बंधाऱ्यातील पाणी पातळी अनेकदा खालावलेली असते. शिवाय, पाण्याची मागणीही वाढली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांकडून टॅंकरच्या मागणीतही वाढ झाली आहे.

सोसायट्यांना विकसकाची मदत
पाणीटंचाईच्या काळात सोसायटीला स्वखर्चाने पाणी देण्याचे हमी पत्र महापालिका प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांकडून बांधकाम परवाना देतानाच घेतले आहे. त्याअनुषंगाने काही मोजक्या सोसायट्यांना बांधकाम व्यावसायिक स्वतः पाणी पुरवतात. त्यामुळे सोसायटी रहिवाशांना मोठी मदत होत आहे, तर काही बिल्डरांकडून महापालिकेच्या हमीपत्राचे पालन केले जात नसल्याचे दिसते. यासंदर्भात नागरिक संबंधितांविरुद्ध तक्रार करू शकतात, असे प्रशासनाने सांगितले.

सद्यःस्थितीत दैनंदिन पाणीपुरवठा
स्रोत / दशलक्ष लिटर (एमएलडी)
पवना धरण / ५१०
आंद्रा धरण / १००
एमआयडीसी / ३०
एकूण / ६४०

धरणांतील पाणीसाठा (टक्क्यांमध्ये)
धरण / साठा (२०२६) / साठा (२०२५)
पवना / ६२.९२ / ६१.३२
आंद्रा / ७१.३१ / ६३.७०

पाणीसाठी अधिक, तरीही...
१. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला यंदा दोन्ही धरणांत पाणीसाठा अधिक असला, तरी पुढील चार महिने उन्हाळ्याचे आहेत. त्यामुळे पाणी जपून वापरणे आवश्यक
२. पवना व इंद्रायणी नदी पात्रातून शेतकरीही पाणी उपसा करतात. तसेच, दोन्ही नद्यांसह पवना व आंद्रा या धरणांतून अन्य गावांनाही पाणीपुरवठा केला जात आहे

महापालिकेचे नागरिकांना आवाहन
- लोकसंख्या वाढीच्या तुलनेत पाण्याचा साठा व पुरवठा जैसे-थे असल्याने पाणी जपून वापरावे
- वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये
- बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होत तेव्हा अर्थात सायंकाळच्या वेळेस झाडांना पाणी द्यावे, ते पिण्याचे पाणी नसावे
- नळ सुरू ठेवून भांडी किंवा कपडे धुवू नयेत
- प्रत्येकाने दररोज ठरवले तर १० ते १५ टक्के पाणी वाचवणे शक्य आहे
- भविष्यात पावसाळा लांबल्यास आता वाचवलेले पाणीच उपयुक्त ठरणार आहे

पिंपरी चिंचवड शहरात राहण्यासाठी लोकांची पसंती आहे. त्यामुळे इमारतींची संख्या पर्यायाने लोकसंख्या वाढत आहे. त्यातुलनेत पाणी वाढत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे. दिवसाआड पाणी मिळत असल्याने साठवून ठेवावे लागते. पाणी नळाला येते, तेव्हा आधीचे पाणी फेकून देऊ नये.
- अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT