पिंपरी-चिंचवड

‘दिल की धडकन’ मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

पिंपरी, ता. १५ ः ‘हम प्यार करनेवाले’, ‘मेरा दिल भी कितना पागल है’, ‘ए मेरे हमसफर’, ‘जानेमन जानेमन’, ‘इस प्यार से मेरी तरफ’, ‘बादल यू गरजता हैं’, ‘तू ही रे’ या प्रेमगीतांनी रसिक भारावून गेले. निमित्त होते इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘दिल की धडकन’ या हिंदी चित्रपटगीतांच्या निःशुल्क सांगीतिक मैफलीचे. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या सादरीकरणाला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राखी झोपे आणि अनिल झोपे या दांपत्याच्या संकल्पना आणि निर्मितीतून साकार झालेल्या या खास सांगीतिक मैफलीत विजय किल्लेदार, भारती किल्लेदार, किरण वैद्य, अनिल झोपे, राखी झोपे, राजेश कुलकर्णी, कविता शाह, वेंकट श्रीनिवास, सदानंद भोसले, स्वप्निल शेठ, श्रीया दास, स्वाती केसकर या गायक कलाकारांनी आपल्या युगुलस्वरातील अप्रतिम अन् अविस्मरणीय गीतांच्या माध्यमातून प्रेम या मानवी भावविश्वातील सर्वोच्च भावनेच्या वैविध्यपूर्ण छटांची सुरेल अनुभूती दिली.
‘व्हॅलेंटाईन्स डे’निमित्त आयोजित ४६व्या विशेष सांगीतिक मैफलीचा प्रारंभ हृदयाच्या आकारांचे गुलाबी फुगे रंगमंचावर आकर्षकरीत्या मांडून करण्यात आला. ‘हमको सिर्फ तुमसे प्यार’, ‘देखा एक ख्वाब तो’, ‘दिल हैं के मानता नही’, ‘हो गया हैं तुज को तो प्यार’, ‘तुम्ही देखो ना’,‘कभी मैं कहू’, ‘आजा शाम होने आयी’ अशा एकाहून एक श्रवणीय गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘परदेसीयाँ ये सच हैं पिया’ या गीताने मैफलीचा समारोप झाला. आदिती खटावकर यांनी निवेदन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA vs NAM Controvarsy : नामिबियाच्या कॅप्टनने झेल टिपला, पण निर्णय नाबाद दिला गेला! No Ball नव्हता, तरीही नेमका काय झाला राडा?

वाहतूक कोंडीपासून दिलासा! महाराष्ट्रातील ३,३२० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजूरी; मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाहा मार्ग...

T20 World Cup सुरू असताना न्यूझीलंडचा दिग्गज अचानक परतला घरी! दुखापत नाही, तर 'हे' आहे कारण

'सचिन ट्रोल होतो कारण तो...' पिळगांवकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले...'त्याने तरुणपणीच...'

Horoscope : उद्या १६ फेब्रुवारीला 'या' ५ राशींचं भाग्य जोरात! घरी येईल पैसा अन् नोकरीत मिळेल मोठं यश, प्रेमसंबंधांना नवे वळण

SCROLL FOR NEXT