पिंपरी-चिंचवड

शिष्यवृत्ती सराव परीक्षा यंदा रद्द

CD

पिंपरी, ता. १६ : इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाण्‍याअगोदर दरवर्षी महापालिका स्तरावर सराव परीक्षा घेतली जाते. पण, यावर्षी ही सराव परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सर्व शाळांनी आपापल्या स्तरावर सराव घेऊन विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन करण्याच्या सूचना महापालिका शिक्षण विभागाने दिल्या आहेत. सराव परीक्षा का रद्द केली, याबाबत विचारणा केली असता शिष्यवृत्ती समन्वयक सुभाष सूर्यवंशी यांनी बोलण्यास नकार दिला. तर, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी ‘‘नंतर माहिती देते,’’ असे सांगितले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत दरवर्षी फेब्रुवारीत ही शिष्यवृती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला सर्व प्रकारच्या शाळांतील विद्यार्थी सामोरे जातात. मराठी, इंग्लिश, हिंदी व उर्दू या चार माध्यमांतून विद्यार्थी परीक्षा देतात. उच्च प्राथमिक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे नऊ हजार ३८१, तर पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी चार हजार ८७८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. ही संख्या लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभागाकडून परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात येते. या विद्यार्थ्यांची १५ फेब्रुवारी रोजी सराव परीक्षा होणे अपेक्षित होते. पण, यापूर्वीच महापालिकेच्या शिक्षण विभागाने परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत गोंधळ उडाला आहे.

हॉल तिकीट आवश्यकच
रविवारी (ता.२२) होणाऱ्या शिष्यवृत्ती मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) आवश्यक आहे. सर्व शाळांनी ‘स्कूल लॉगिन’ यंत्रणेतून हॉल तिकिटची प्रिंट काढून मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्याने प्रमाणित करावे. हॉल तिकिटशिवाय विद्यार्थ्याला परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही. हॉल तिकिटवरील सर्व सूचनांचे वाचन करुन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करुन मार्गदर्शन करावे. परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार ‘‘जी शाळा केंद्र शाळा आहे तेथील विद्यार्थी इतर परीक्षा केंद्रावर परीक्षा देतील. प्रवेश पत्रावर जे परीक्षा केंद्र असेल त्याच केंद्रावर परीक्षेसाठी विद्यार्थी जातील. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी गैरहजर राहणार नाहीत याची सर्व मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांनी खबरदारी घ्यावी.’’

छापील गुणपत्रक मिळणार नाही फेब्रुवारी-२०२५ म्हणजेच मागील वर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे छापील गुणपत्रक मिळणार नाहीत. हे गुणपत्रक २०२५ या वर्षातील ‘स्कूल लॉगिन’ करून गुणपत्रक डाउनलोड करून प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावे लागणार आहेत. २०२५ च्या परीक्षेत जे विद्यार्थी राज्य, जिल्हा अथवा तालुक्याच्या गुणवत्ता यादीत आले आहेत, त्यांचे प्रमाणपत्र आले असून चिंचवडगाव हुतात्मा चापेकर विद्या मंदिराच्या शिष्यवृत्ती कार्यालयातून ते घेऊन जाण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

Priyank Kharge : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दैत्यासारखा, भाजप त्या दैत्याची सावली'; काँग्रेस अध्यक्षांच्या मुलाची जहरी टीका

Kolhapur City :हद्दवाढीशिवाय विकास नाही! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्ट संकेत; केंद्राच्या योजनांसाठी कोल्हापूरला विस्तार आवश्यक

Latest Marathi News Live Update : मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज

SCROLL FOR NEXT