पिंपरी-चिंचवड

आयटीयन्सची वाहतूक कोंडीतून सुटका लांबणीवर

CD

पिंपरी, ता. १७ : बहुचर्चित व बहुप्रतिक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू करण्यास आणखी दोन महिने लागण्याची चिन्हे आहेत. ही मेट्रो मार्चमध्ये धावण्याचे नियोजन आधी करण्यात आले होते. पण, आता एप्रिलअखेरचे नियोजन करण्यात आले आहे. ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याने मार्गिकेवरील सर्व स्थानके पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यास अजूनही काही महिने लागणार आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यातही या मार्गावरील आयटी कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कला पुण्याशी जोडणाऱ्या या मेट्रो मार्गिकेचे काम २०२१ मध्ये सुरू झाले. २३ किलोमीटरचा पल्ला असलेल्या मेट्रो-३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हे काम ‘पीपीपी’ अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरिशिप तत्त्वावर ‘आयटी सिटी मेट्रो’ या कंपनीला दिले आहे. प्रकल्पाच्या संथगती कामामुळे नागरिकांना खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी या सारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागले. ही मार्गिका मार्च २०२६ मध्ये सुरू होणार असल्याचे ‘पीएमआरडीए’ने सांगितले होते. मात्र, सध्या या मार्गिकेवरील मेट्रो स्थानके, जिने, लिफ्ट यांचे उर्वरित काम पाहता ही मार्गिका पूर्णपणे सुरू होण्यात अजूनही काही महिन्यांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे या ‘रेड लाइन’ मेट्रोच्या चाचणी यशस्वी झाली असली, तरी अनेक कामे अपूर्णच आहेत.

ही कामे बाकी
- सिग्नल यंत्रणा आणि सरकते जिने
- काही मेट्रो स्थानकांच्या लिफ्ट व जिन्यांचे काम अपूर्ण
- अग्निशमन यंत्रणा, तिकीट प्रणाली
- प्रवासी वाहतुकीसाठी आवश्‍यक तांत्रिक कामे
- ‘सीआरएमस’ ऑडिट

‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचे काय’? आयटीयन्सचा प्रश्‍न
‘मेट्रो-३ ही मार्च २०२६ मध्ये धावणार होती. मात्र, उर्वरित कामे पाहता ती पूर्ण क्षमतेने मेट्रो सुरू होण्यास किमान चार ते पाच महिने लागू शकतात. ही मार्गिका सुरू होताना स्टेशनपर्यंत जाण्यासाठी पदपथ, स्टेशनजवळ पार्किंग, शटल बस या ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’च्या सुविधादेखील द्याव्यात, अशी मागणी आयटीयन्सने केली होती. मात्र, तशी कामे दिसत नसल्याचे आयटीएन्सचे म्हणणे आहे. त्यामुळे मेट्रो सुरू झाली तरी हिंजवडीतील वाहतूक कोंडी सुटणार का, असा प्रश्‍न आयटीयन्सने विचारला आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील मुदतवाढीबाबत आमच्याकडे ‘आयटी सिटी मेट्रो’कडून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे मेट्रो एप्रिलअखेर अंशतः सुरू केली जाईल. मार्गिकेवरील काही स्थानकांचे सुरू आहे. मेट्रोची चाचणी नुकतीच घेण्यात आली. मात्र, अद्यापही काही कामे अंतिम केली जात आहेत. ऑडिट होऊनच मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येईल.
- रिनाझ पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

मेट्रो-३ मार्गावर विद्यापीठ चौक, हिंजवडी, बाणेर, शिवाजीनगर, बालेवाडी हाय स्ट्रीट ही महत्त्वाची स्टेशन आहेत. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका सुरू करताना या स्टेशनच्या कामांना प्राथमिकता देणे आवश्‍यक आहे. ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’चे काम अद्याप सुरू झालेले नाही. पहिल्या टप्प्यात नक्की कोणती स्थानके सुरू होणार, याबाबतही स्पष्टता नाही.
- प्रशांत पंडित, सचिव, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Acquisition Payment To Farmers : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

AUS vs IND: भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅच विनर खेळाडूची एन्ट्री; BCCI ने जाहीर केला बदल

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

T20 World Cup: औपचारिकता गांभीर्याने पूर्ण करणार; भारताचा आज नेदरलँड्ससोबत टी-२० विश्वचषकचा अखेरचा साखळी सामना!

SCROLL FOR NEXT