समतल विलगीकरण दुरुस्तीची गरज
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर निगडी ते दापोडी दरम्यानच्या समतल विलगकामध्ये वाहनांना आत येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी एकच जागा आहे. पूर्वी असे नव्हते. मेट्रो किंवा इतर काम करिता ही मोडतोड केरण्यात आली होती. मात्र अद्याप दुरुस्त करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होते तसेच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे महामार्गाची दोन्ही बाजूंनी पाहणी करून बाहेर आणि आत येण्याच्या जागेची योग्य दुरुस्ती संबंधित विभागाने त्वरित करावी.
- गौरव जोशी, थेरगाव रस्ता, चिंचवड
पदपथावर वाहनांचा कब्जा; कारवाईची मागणी
चिंचवड गावातील चित्तराम जमाती मंदिर ते केशवनगर शाळेजवळील पदपथावर नेहमीच चार चाकी उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. वारंवर तक्रार करूनही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेने या परिसरातील वाहनांवर दंडात्मक कारवाई करून पदपथ चालण्यासाठी रिकामा करावा.
- जितेंद्र निखळ, केशवनगर, चिंचवड