पिंपरी-चिंचवड

हिंजवडी परिसरातील वाहतूक मार्गात गुरुवारी बदल

CD

पिंपरी, ता. १७ : शिवजयंतीनिमित्त हिंजवडी गावठाण येथे गुरुवारी (ता. १९) मिरवणुका काढण्यात येणार आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर हिंजवडी गावठाण ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक हिंजवडी असा मिरवणूक मार्ग असणार असून, यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. यामुळे सार्वजनिक रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गात गुरुवारी दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत बदल करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

असा असेल बदल
- कस्तुरी चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मारुंजी वाय जंक्शन चौकाकडून कस्तुरी चौकमार्गे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहने कस्तुरी चौक येथून उजवीकडे वळून विनोदे वस्ती मार्गे डावीकडे वळून इंडियन ऑईल चौक मार्गे जातील. तसेच मेझा-९ चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहने छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथून सरळ पुढे जाऊन इंडीयन ऑईल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती मार्गे जातील.
- छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून यू-टर्न घेऊन जांभूळकर जीम चौक मार्गे हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहने जांभूळकर जीम चौकातून सरळ पुढे इंडियन ऑईल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती चौक मार्गे जातील.
- मेझा-९ चौकाकडून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेन पैकी डावी लेन बंद करून सर्व वाहतूक ही उजव्या बाजूच्या लेनने सुरू राहील.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT