पिंपरी-चिंचवड

‘एसटी’ची सेवा समान, तरीही भाडे वेगळे

CD

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ : आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंसाठी उपयोगात आलेल्या, आरामदायी प्रवास घडवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग (एसटी) महामंडळाच्या एशियाड (हिरकणी) बसची संख्या आता कमी होत आहे. तर, ताफ्यात नुकत्याच आलेल्या नव्या ‘लालपरी’ आणि जुन्या ‘हिरकणी’ बसमध्ये रंगसंगती वगळता फारसा फरक राहिलेला नाही. पण, सुविधा समान असताना एकाच मार्गावर भाडे वेगळे का? असा प्रश्‍न आता प्रवासी विचारत आहेत.
दिल्ली येथे १९८२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना ने-आण करण्यासाठी एसटीने स्वतःच्या दापोडी आणि छत्रपती संभाजीनगर येथील कार्यशाळेत २०० आराम बसची निर्मिती केली होती. स्पर्धा संपल्यानंतर महामंडळाने ५० बस खरेदी करत प्रवासी सेवा सुरू केली. ‘एशियन गेम्स’ या वरून ‘एशियाड’ हे नाव या बसला देत दादर-पुणे मार्गावर या बस धावल्या. आरामदायी, जलद प्रवास, विशिष्ट संरचना आणि वेगळी रंगसंगती यामुळे अल्पावधीच या बस प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या. प्रतिसाद वाढल्याने राज्यात इतर मार्गांवरही ‘एशियाड’ धावू लागली. निमआराम सेवा असल्यामुळे या बसचे तिकीटही साध्या बसपेक्षा अधिक आणि ‘शिवशाही’, ‘शिवनेरी’ बसपेक्षा कमी ठेवण्यात आले. दरम्यान आठ मार्च २०१३ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून ‘एशियाड’ बसचे ‘हिरकणी’ असे नामकरण करण्यात आले. हिरव्या-पांढऱ्या रंगाऐवजी गुलाबी-पांढरा अशी रंगसंगती ठेवण्यात आली. आता पुन्हा ‘शिवशाही’चे ‘हिरकणी’मध्ये रुपांतर होणाऱ्या बसचा रंग पूर्वीप्रमाणे हिरवा-पांढरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या २९१ ‘हिरकणी’ बस राज्यातील विविध मार्गांवर धावत आहेत.
दरम्यान, राज्य शासनाने डिझेल तीन हजार आणि पाच हजार ई-बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्याने या बस दाखल होणार आहेत. या नव्या ‘लालपरी’मध्ये पुशबॅक सीट, चार्जिंग पॉइंटसह विविध सुविधा आहेत. त्यामुळे ‘लालपरी’ आत सर्व सुविधांयुक्त झाली आहे. यामुळे आता ‘हिरकणी’ आणि ‘लालपरी’ बसमध्ये विशेष फरक राहिलेला नाही. मात्र, ‘लालपरी’पेक्षा ‘हिरकणी’ बसचे भाडे अधिक आहे. सुविधा जवळपास सारख्या असताना भाडे अधिक का? असा प्रश्‍न प्रवासी विचारत आहेत.
-------
अधिकारी म्हणतात, ‘आणखी विचार नाही’
‘हिरकणी’ आणि ‘लालपरी’ बसमधील भाडेदरातील तफावतीबाबत ‘सकाळ’ प्रतिनिधीने एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर ‘या तफावतीबाबत एसटी महामंडळाने आणखी विचार केला नाही,’’ असे या अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.

बस प्रकार, मार्ग आणि भाडे
साधी ‘लालपरी’
पुणे ते अकोला : ८२० रुपये
स्वारगेट ते कोल्हापूर : ३८८ रुपये
----
‘हिरकणी’
पुणे ते अकोला : ११२५
स्वारगेट ते कोल्हापूर : ५२५

PNE26V96762, PNE26V96759

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Candidates for Rajya Sabha: भाजपमध्ये ‘भाऊगर्दी’, दिल्लीत अंतिम निर्णय! राज्यसभेसाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब? ५ नावे चर्चेत

'जेलमध्ये स्मोकिंग झोन बनवला पाहिजे...' तिहार तरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Viral News : भंगारवाल्याचा प्रामाणिकपणा ! सहा महिन्यांनी परत केले १५ लाखांचे दागिने, दु:खी कुटुंबाच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणात 27 जणांवर गुन्हे दाखल

Sarkari Naukri 2026: सरकारी नोकरीची संधी! तीन नामांकित संस्थांकडून मोठी भरती जाहीर; अर्जाची संपूर्ण माहिती येथे वाचा

SCROLL FOR NEXT