पिंपरी-चिंचवड

पाठीला दणके, मानेला झटके, मणक्याचे दुखणे

CD

पिंपरी, ता. १८ : शहरातील काही रस्त्यांवर अनावश्‍यक आणि अशास्त्रीय गतिरोधक असल्याच्या तक्रारी वाहनचालक करत आहेत. त्यामुळे पाठीला दणके सहन करण्यासह विशेषत: दुचाकीस्वारांच्या मानेला झटके बसत आहेत. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा मार्गावर मानकांनुसार कामे होऊ शकतात, तर इतर रस्त्यांवर गतिरोधके आंतरराष्ट्रीय मानकांनुसार का नाहीत? असा प्रश्‍न वाहनचालक विचारत आहेत.

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ या सायकल स्पर्धेसाठी महापालिका प्रशासनाने औंध येथील राजीव गांधी पूल ते किवळे रस्ता, निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल ते काळेवाडी फाटा, निगडी येथील भक्ती-शक्ती चौक ते एमआयडीसी भाग, चिंचवड येथील सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल, विनोदे वस्ती चौक ते भुमकर चौक ते आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, स्पाइन रस्ता, भक्ती-शक्ती चौक ते गोडाऊन चौक या ५२ किलोमीटर मार्गावरील रस्ते आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आले. डांबरीकरण, दुभाजके, विद्युत प्रकाश खांब, बीआरटीचे बॅरिकेट्स व पुलाची रंगरंगोटी करण्यात आली. रस्त्याकडेचे गटार व रेलिंगची दुरुस्ती करण्यात आली. तसेच, सायकलच्या वेगात अडथळे नकोत, म्हणून गतिरोधके हटविणण्यात आले.
तर, या कामांवेळी काही ठिकाणी गतिरोधकांची उंची, लांबी आणि रुंदी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ठेवण्यात आली. त्यामुळे या मार्गांवरुन प्रवास करणाऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मात्र, शहरातील इतर मार्गांवर आजही काही ठिकाणी अनावश्‍यक आणि अशास्त्रीय गतिरोधके असल्याचे पाहणीवेळी दिसून आले. त्यामुळे वाहनचालकांना पाठीचे, मणक्याचे आजार उद्भावत आहेत. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

सायकल स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय निकषानुसार गतिरोधक बनविले होते. त्या गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होत नाही. त्यामुळे इंडियन रोड्स काँग्रेसच्या नियमांनुसार शहरातील रस्त्यांवर गतिरोधक बनविण्यात येणार आहेत.
- मकरंद निकम, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

गतिरोधकाबाबतचे नियम

- इंडियन रोड्स काँग्रेसच्या कोड १९९८-९९ नुसार गतिरोधक केवळ ०.१० मीटर (४ इंच) उंच आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी उतार ३.७ मीटर (१२ फुट) इतका रुंद असायला पाहिजे
- गतिरोधक येण्यापूर्वी ४० मीटर अंतरावर ६० सेंटीमीटर आकाराचे सूचना फलक आवश्यक
- गतिरोधकाच्या आधी पाच मीटरवर थर्मोप्लॅस्ट रंगाने ‘रब्मलर स्ट्रीप’ आवश्यक
- गतिरोधकावर पांढरे पट्टे रंगवलेले असावेत
- गतिरोधक रात्रीच्या अंधारातही लक्षात येण्यासाठी त्यावर चमकदार पट्ट्या (रिफ्लेक्टर) असाव्यात
- प्रत्येक गतिरोधकाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना असावी
- रस्त्याची जेवढी रुंदी असेल तेवढ्या रुंदीवर ‘रम्ब्लर स्ट्रीप’च्या सुरुवातीला कॅट्स आय (पिवळ्या रंगाचे) लावणे आवश्यक
- वाहने गतिरोधकावरून पदपथांवर जाऊ नयेत, यासाठी पदपथांच्या कडेने आणि गतिरोधकाच्या बाजूला प्लॅस्टिकचे बोलार्ड लावावेत


PNE26V96417, PNE26V96418

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muslim Quota: महाराष्ट्रात मुस्लिमांना कोणत्या सरकारने कधी आणि कसे आरक्षण दिले होते? महायुतीने ते रद्द का केले? जाणून घ्या इतिहास...

PAK vs NAM : कर्णधार सलमान आघा अन् प्रशिक्षक माईक हेसन यांच्यात बाचाबाची! संतापाच्या भरात बाटली जोरात फेकली Video

Latest Marathi News Live Update : पुणे - इंदोर महार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

PAK VS NAM: पाकिस्तानने 'बाबर आजम'ची Live सामन्यात लाज काढली! नामिबियाविरुद्ध जे घडलं, त्याची जगभर चर्चा; असं व्हायला नको होतं

Viral Video: रोड ट्रिपचा अनोखा अंदाज! ट्रॉलीमध्ये बसून दोन श्वानांचा मजेदार प्रवास व्हायरल

SCROLL FOR NEXT