पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडची हवा ‘खराब’

CD

पिंपरी, ता.१८ : पुण्याचे जुळे शहर आणि उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराची हवा गेल्या काही महिन्यांत ‘खराब’ श्रेणीत नोंदवली जात आहे. यामुळे राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवडचा समावेश झाला आहे. शहराची वाढती लोकसंख्या, वाहने आणि वृक्षतोड करून उभ्या राहिलेल्या इमारतींमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. पर्यावरण जपण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबतची प्रशासकीय उदासीनताही या स्थितीला कारणीभूत आहे.

हिंजवडी, तळवडे या परिसरांत आयटी पार्क सुरू झाल्यानंतर ‘आयटीनगरी’ म्हणूनही पिंपरी चिंचवडला ओळख मिळाली. जवळच असणारा मुंबई-पुणे महामार्ग, उत्तमोत्तम शैक्षणिक संकुले, रोजगाराच्या संधी, प्रशस्त रस्ते व शहराचे उत्तम नियोजन यामुळे पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडकडे नागरिकांचा ओढा वाढू लागला. वाढणाऱ्या लोकसंख्येला घरे पुरवण्यासाठी उंच इमारती उभ्या राहिल्या आणि उपनगरांतील शेतजमिनींवर बांधकामे झाली. विकासकामे, रस्ते रुंदीकरण, मेट्रो यासाठी वृक्षतोड झाली. लोकसंख्या वाढली, वाहनसंख्या वाढली मात्र शहराला ऑक्सिजन देण्यासाठी आवश्यक उद्याने, बागा, इको पार्क यांचा मात्र तितका विकास झाला नाही. परिणामी, पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली. पावसाळ्यानंतरच्या काळातील प्रदूषणाचा आलेख दरवर्षी वाढू लागला.

प्रदूषणवाढीची कारणे
- महापालिकेत समाविष्ट उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण
- रस्ते, पदपथ यांच्यासारख्या पायाभूत सुविधा देण्यास महापालिका अपयशी
- रस्त्यांवर वारंवार खड्डे पडून वाहतुकीचा वेग मंदावतो. कोंडी होऊन वाहनांतून धुराचे उत्सर्जन वाढते
- वाढलेल्या बांधकामांमुळे अनधिकृत आरएमसी प्लॅंटचे पेव
- आरएमसी प्लॅंटमधून उडणारी धूळ, बांधकामांचा कच्चा माल नेताना रस्त्यावर पडणारी वाळू व खराब रस्त्यांमुळे प्रदूषणात भर
- धुळीतील सध्या ‘पीएम १०’ व ‘पीएम २.५’ हे घटक मुख्य प्रदूषक
- अपूर्ण व रखडलेली विकासकामे; रस्त्यावर पडलेला राडारोडा

महिना आणि हवा गुणवत्ता निर्देशांक
नोव्हेंबर २०२४ : १८९
डिसेंबर २०२४ : १२९
जानेवारी २०२५ : १६२
फेब्रुवारी २०२५ : १३३
मार्च २०२५ : १३१

डिसेंबर-२०२५ सर्वाधिक प्रदूषित
गेल्या वर्षी हिवाळ्यात पिंपरी चिंचवडचा हवा गुणवत्ता निर्देशांत अर्थात ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआय) सातत्याने २०० च्या पुढे म्हणजे ‘खराब’ श्रेणीमध्ये राहिला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ या ॲपवर प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर, डिसेंबर- २०२५ या दोन महिन्यांत हवा सर्वाधिक प्रदूषित राहिली. तर, जानेवारी-२०२६ मध्ये ती ‘मध्यम’ प्रदूषित श्रेणीमध्ये नोंदविण्यात आली. शहरातील हवा प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रणेपैकी थेरगाव आणि वाकड या केंद्रांवर सातत्याने हवामान ‘खराब’ श्रेणीत नोंदवले गेले आहे.

शहरातील सर्वाधिक प्रदूषणाचे दिवस
ऑक्टोबर-२०२५ मध्ये ११ दिवस हवा ‘मध्यम’ श्रेणीत, तर एक दिवस हवा ‘खराब’ श्रेणीत होती, नोव्हेंबर-२०२५ मध्ये सात दिवस हवा ‘खराब’ श्रेणीत होती. जानेवारी २०२६ मध्ये तब्बल २५ दिवस हवा ‘मध्यम’ प्रदूषित होती.

डिसेंबर २०२५ मधील नोंदी (एक्यूआय)
१ डिसेंबर - २१२
२ डिसेंबर - २२४
३ डिसेंबर - २२६
८ डिसेंबर - २०६
१२ डिसेंबर - २२८
१३ डिसेंबर - २४२
१४ डिसेंबर - २३६
१५ डिसेंबर - २१०
१८ डिसेंबर - २३६
१९ डिसेंबर - २०४
२६ डिसेंबर - २४३
२७ डिसेंबर - २२२
२८ डिसेबर - २१९
२९ डिसेंबर - २३४
३० डिसेंबर - २३४
(महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या नोंदींनुसार डिसेंबर-२०२५ मध्ये पंधरा दिवस शहरातील हवा ‘खराब’ श्रेणीत नोंदवली गेली.)


प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवलेली हवेची गुणवत्ता मानांकन
‘एक्यूआय’ हवेची गुणवत्ता
०- ५० चांगली
५१ - १०० समाधानकारक
१०१ - २०० मध्यम प्रदूषित
२०१ -३०० खराब
३०१ - ४०० अत्यंत खराब
४०१ च्या पुढे : गंभीर

पुनावळे, ताथवडे सर्वाधिक प्रदूषित
पिंपरी चिंचवडला हिंजवडीशी जोडणाऱ्या उपनगरांध्ये हवा ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदविण्यात येत आहे. या भागातील पुनावळे, ताथवडे, मारुंजी भागात खराब रस्ते, आरएमसी प्लॅंट व मिक्सरमुळे उडणारी धूळ या कारणांमुळे हवेची गुणवत्ता कमालीची ढासळली आहे. डिसेंबर महिन्यात येथील ‘एक्यूआय’ सातत्याने ३०० च्या पुढे नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

Holi Horoscope Predictions: होळीनंतर मेषसह 'या' दोन राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; गुरु मार्गी होताच सुख-समृद्धीचे नवे योग

Latest Marathi News Live Update : "कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, डेटा गोळा करण्याचं काम सुरु"- चंद्रकांत पाटील

फक्त 6 दिवसांत बदलणार मिथुनसहित तीन राशींचं नशीब; गजकेसरी योगामुळे होणार पैशांची बरसात

Jalgaon News : जळगाव हादरलं! वाळूमाफियांची मुजोरी वाढली, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ८ वेळा हल्ले

SCROLL FOR NEXT