पिंपरी, ता.१९ ः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांमध्ये पारंपरिक वाद्यांच्या तालावर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला. पारंपरिक वेशभूषा, ढोलताश्यांचा गजर, पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसून आला. अनेक शाळांमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, मिरवणुका आणि शिवकालीन थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. लहान मुले मावळ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले, तसेच शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित देखावे सादर केले गेले.
शिवचरित्रातील विविध प्रसंगाचे नाट्यगीत
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व आरती केली. प्रास्ताविक प्राचार्या सारंगा भारती यांनी केले . शिवजयंतीच्या निमित्ताने प्रसिद्ध शिवव्याख्याते काजल भेगडे-काटे यांनी विद्यार्थिनींना बालशिवाजी कसे रयतेचे राजे झाले. याबाबत मार्गदर्शन केले. शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा परिधान केले होती. तसेच मृणाल अडसूळ, पिया वसेकर, रेणुका वैद्य, आकांक्षा आघाव, श्रद्धा जाधव यांनी भाषणे केली. श्वेता देव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवचरित्रातील विविध प्रसंगाचे नाट्यगीत तसेच शिवाजी महाराजांचे पाळणा नृत्य व ‘राजं आलं राजं आलं’ हे नृत्य विद्यार्थिनींनी सादर केले. या वेळी शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. संयोजन पर्यवेक्षक शशिकांत हुले यांनी केले. सूत्रसंचालन विजयाराणी गडचे यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापिका सुषमा बंब यांनी केले.
लेझीमच्या तालावर भव्य मिरवणूक
वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाने ढोल ताशाच्या गजरात व लेझीमच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या प्रसंगी उद्योजक भाऊसाहेब जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुधीर शिंगटे, सामाजिक कार्यकर्ते राजू तापकीर, विभाग प्रमुख नितीन वारखडे , प्रवीण सोनवणे, डॉ. कल्याण वाघ उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षक मनोज रामगुडे यांनी केले. अदिती शेंगर, वेदिका घोडे, वैष्णवी जोगदंड, दीपिका रावताळे, कार्तिकी घुले यांनी मनोगत व्यक्त केले. विभा वाबळे या विद्यार्थिनीनी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचे सादरीकरण केले. माऊली हरगुडे याने शिवरायांची घाटोळी सादर केली, तसेच विराज लांडगे याने ‘शिवगर्जना गारद’ यावेळी सादर केली. खो-खो खेळाडू अपर्णा वर्धे हिला १४ वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून दिला जाणारा ‘इला पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. क्रीडाशिक्षक संजय जैनक यांचा देखील सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन निवृत्ती ठाणवे, स्वाती काळे, स्वाती मोरे यांनी केले. आभार शिरीष कुमार सूर्यवंशी यांनी मानले.
गोलांडे प्राथमिक विद्यालयात पाळणा, संगीत पोवाडा
चिंचवड येथील कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका उज्वला चौधरी व बाल शिवाजी व जिजाबाईंच्या वेशातील विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांचा जयघोष करीत पालखी मिरवणुकीने झाली. पाळणा, संगीत पोवाडा, नाट्यछटा, गीते ,भाषणांनी शिवाजी महाराजांची महती व विविध प्रसंगावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन मनीषा डोंगरदिवे यांनी केले.
गुरू गणेश विद्यामंदिरात साहसी खेळांचे प्रात्यक्षिक
श्री गुरू गणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात प्राचार्य हनुमंत मारकड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती दिली. ब्रह्म सिंह गुरुकुल मोरे वस्ती, चिखली यांच्या वतीने साहसी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. प्रज्ञा मोरे, अर्णव साळुंखे, धीरज मराठे, श्रावणी स्वामी, श्रद्धा पारवे, आरती बनसोडे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. वेदांत सलते, स्वराज चौगुले, रिया मोहोळकर, संध्या सोलापुरे, गौरी आंब्रे, श्रेया सोगे या विद्यार्थिनी शिवाजी महाराज, उदयभान औरंगजेब यांच्या वेशभूषा सादर केल्या. विद्यार्थ्यांना प्रीतम चोपडा, प्रियांका नारखेडे, सविता ठाकूर, लक्ष्मण गुंजाळ, सुखदेव तांबे, अश्विनी अत्रे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मारुती तोत्रे यांनी केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक हितेंद्र लोखंडे यांनी आभार मानले.
सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर
आकुर्डी येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर येथे हस्ते शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. गोविंदराव दाभाडे होते. मुख्याध्यापक राजू माळे, गजानन उफाडे उपस्थित होते. प्रास्ताविक अंकिता केंदळे हिने केले. निवेदन राजवीर वाळके व वेदिका कोशिरे या विद्यार्थ्यांनी केले. चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांची आरती व दैवत छत्रपती हे स्फूर्तीगीत सादर केले. आराध्या धनगर, शिवराज क्षीरसागर, देवांश पाटील, यज्ञेश शिवगण, मिताली गिडये, आराध्या बारी, आनंदी गवारे या विद्यार्थ्यांनी शिवरायांविषयी माहिती दिली. अर्पिता शिरढोणे व श्रीराम टेकाळे यांनी ‘प्रतापगडाच्या पायथ्याशी खान’ तर सुमीत गोलकोंडे याने ‘जाणता राजा असा एकच होऊन गेला’ हा पोवाडा सादर केला. या वेळी गौरव थापडे, श्रुती अंगरके, आराध्या गायकवाड, समृद्धी शिंदे, गणेश जाधव, प्रीतम बनसोडे, आदर्श शिंदे, सार्थक जाधव, सोहम तांबे, श्रद्धा सरवदे, अनन्य थोरात, समृद्धी वराडे यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा हे नाटक सादर केले. मंगेश अहिरे यांनी शिक्षक मनोगत केले. अनन्या भोसले यांनी आभार मानले. नियोजन नयना पाटील, माधुरी सोनवणे, प्राजक्ता बंडगर, अविनाश आखाडे यांनी केले. संगीत साथ प्रकाश कोळप यांनी दिली.
किलबिल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज
पिंपळे गुरव येथील किलबिल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक सोहळ्यामध्ये शाळेचे व महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उत्साहाने सहभागी झाले. या प्रसंगी शाळेचे संस्थापक नासिर सौदागर, राहील सौदागर उपस्थित होते. माता तुळजाभवानी मंदिर चौकात या भव्य मिरवणुकीचा सांगता झाली.
श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल
श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आदित्य राऊत, संघर्ष कांबळे, तनवी उंप, स्वाती वाघमारे, या विद्यार्थ्यांनी पाळणा, पोवाडा, आरती सादर केले. सुनीता शिंदे, विठ्ठल शेवाळे, संध्या पाटील या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य विक्रम काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रकट केला. क्रीडा शिक्षक संदीप माशेरे, रवींद्र गारगोटे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मनोरे सादर केले. स्वरांगी देशपांडे यांनी ढोल ताशा पथकांवर घोषणा विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. प्रास्ताविक पर्यवेक्षक रामनाथ खेडकर यांनी केले. पल्लवी दुसाने यांनी सूत्रसंचालन केले. अलका बारगजे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.