पिंपरी, ता. १९ ः ‘साहित्यिक हा लोककलेचा आत्मा आहे. आम्ही कलावंत साहित्यिकांच्या शब्दांना कलेच्या माध्यमातून जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच साहित्यिकांनी केलेला हा लोककलेचा सन्मान माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे,’ असे उद्गार ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी मांडले.
पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे व अध्यक्ष संदीप तापकीर यांच्या हस्ते रघुवीर खेडकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना खेडकर बोलत होते. मागील वीस वर्षांपासून मोशी गावच्या यात्रेमध्ये सातत्याने तमाशाचे खेळ होत असतात. म्हणून आवर्जून तमाशाच्या मंचावरच त्यांचा सत्कार करण्यात आला. मोशी ही संतभूमी असल्याने सत्कारावेळी संतपरंपरेचे उपरणे, तुकाराम पगडी आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. या सत्कार सोहळ्याला रामभाऊ सासवडे, ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे, दादाभाऊ गावडे, डॉ. सीमा काळभोर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, गणेश सस्ते, वंदना आल्हाट, काळुराम दामू सस्ते, सुनील जाधव सस्ते, महीपत साठे, अलंकार हिंगे, सचिन कामठे, अमर कांदे इत्यादी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.