पिंपरी-चिंचवड

व्यावसायिकांची कामगारांकडूनच होतेय फसवणूक

CD

पिंपरी, ता. १९ : शहरासह परिसरात काही ठिकाणी कामगारांकडूनच मालकांची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. विश्वासाच्या नात्यावर उभ्या असलेल्या व्यवसायांमध्येच गैरव्यवहार घडत असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. किरकोळ दुकाने, बांधकाम व्यवसाय, गोदामे, हॉटेल-रेस्टॉरंट, ट्रान्स्पोर्ट व लघुउद्योग क्षेत्रात असे प्रकार घडत आहेत.
वर्षानुवर्षे काम करणाऱ्या, कुटुंबासारखे वागवलेल्या कामगारांकडूनच गैरप्रकार झाल्याने मालकांना दुहेरी फटका बसतो. आर्थिक नुकसान तर होतेच; तसेच मानसिक धक्काही बसतो. लहान व्यवसायांमध्ये एकाच व्यक्तीकडे खरेदी, विक्री व रोख व्यवहारांची जबाबदारी असल्याने धोका वाढतो. नुकसान लक्षात येईपर्यंत मोठी रक्कम हातातून गेल्याचे समोर येते.

असे घडतात प्रकार
- ग्राहकांकडून घेतलेली रक्कम पूर्णपणे खात्यात जमा न करणे.
- खोटी खरेदी दाखवून पैसे काढणे.
- गोदामातील साहित्य हळूहळू बाहेर काढून विक्री करणे.
- यूपीआय किंवा क्यूआर कोडद्वारे बनावट स्क्रिनशॉट दाखवणे.
- ग्राहकांची माहिती किंवा व्यावसायिक माहिती प्रतिस्पर्ध्यांना देणे.
- डिजिटल पेमेंट वाढल्याने काही ठिकाणी ‘पेमेंट झाले’ असे खोटे स्क्रिनशॉट दाखवणे.

का वाढताहेत असे प्रकार?
- आर्थिक ताणतणाव व कर्जबाजारीपणा
- कामगारांमध्ये असुरक्षिततेची भावना
- मालकांकडून लेखी करार व नियमांची कमतरता
- नियंत्रण व तपासणी यंत्रणेचा अभाव
- डिजिटल व्यवहारांची पुरेशी पडताळणी न करणे

काय काळजी घ्यावी
- व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी खालील उपाय महत्त्वाचे ठरू शकतात
- नियुक्तीपूर्व पडताळणी
- ओळखपत्र, पत्ता व पूर्व नोकरीचा संदर्भ तपासणे
- पोलिस व्हेरिफिकेशन करणे
- लेखी करार
- कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या व नियम स्पष्ट करणे
- गोपनीयता करार करणे
- दररोज कॅश काउंटर व स्टॉक तपासणी
- आठवड्याला/मासिक लेखापरीक्षण करणे
- एकाच व्यक्तीकडे सर्व आर्थिक अधिकार न देणे
- सीसीटीव्ही कॅमेरे
- कामगारांशी नियमित संवाद
- वेतन वेळेवर देणे
- तक्रार निवारण यंत्रणा ठेवणे
- फसवणूक किंवा विश्वासघात झाल्यास त्वरित पोलिसांत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.

‘‘काही अपवादात्मक घटनांमुळे सर्व कामगारांवर संशय घेणे योग्य नाही. बहुतांश कामगार प्रामाणिकपणे काम करतात. मात्र व्यवसायात विश्वासाबरोबरच नियंत्रण आणि पारदर्शकता ठेवणेही आवश्यक आहे. विश्वास आणि शिस्त यांचा समतोल साधल्यास अशा घटनांना आळा घालता येईल.
- एक कामगार

‘‘एखाद्याला कामावर ठेवताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्तीचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्यासह त्याची इतर माहिती ठेवणेही आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीबाबत काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

काही घटना
- चिंचवडगाव येथे सराफ व्यावसायिकाने कामगाराकडे सोने वितळविण्यासाठी दिले असता कामगाराने २२ लाख रुपये किमतीचे सोने लंपास केले.
- दुकानात माल विक्रीचे येणारे पैसे कामगाराने स्वतःच्या खात्यावर घेत मालकाची फसवणूक केल्याचा प्रकार निगडी येथे घडला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT