पिंपरी,ता. १९ : भोसरी एमआयडीसीच्या ‘टी-ब्लॉक’ परिसरात या आठवड्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हजारो उद्योगांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा उद्योगांवर गंभीर परिणाम झाला असून अनेक कंपन्यांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.
वीजपुरवठा खंडित होऊन उत्पादन बंद पडल्याने उद्योगांना नुकसान सहन करावे लागले. मार्चअखेर जवळ आल्याने आधीच कामाचा ताण आहे. त्यात वीज खंडित होणे म्हणजे दुहेरी संकट ठरले आहे. या स्थितीने उद्योगांचे नियोजन कोलमडले आहे. एखाद्यावेळी बिल थकल्यास कोणतीही मुदत न देता महावितरणकडून वीज तोडली जाते. मात्र, कंपन्या दिवसभर बंद राहून प्रचंड नुकसान सोसत असताना त्याची जबाबदारी घेण्यास महावितरण तयार नाही, असा आरोप इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केला आहे.
‘‘उद्योग हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा असून, उच्च दराने वीजबिल भरूनही सातत्यपूर्ण वीजपुरवठा न मिळणे हे संतापजनक आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून उद्योगांना दिलासा द्यावा,’’ असे भोर यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.