पिंपरी, ता. २० : मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थांची विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. इंद्रायणीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. किसनाराम थानाराम चौधरी आणि आई दानराम जसाराम चौधरी (दोघेही रा. जोधपूर, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १०.१२ ग्रॅम मेफेड्रॉन, दोन मोबाईल आणि एक वजनकाटा असा एकूण एक लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
---------------------