पिंपरी-चिंचवड

बनावट संकेतस्थळ, मोबाइल ॲपचे ‘जाळे’

CD

पिंपरी, ता. २२ : वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांशी संबंधित बनावट संकेतस्थळ, फसवे मोबाइल ॲप्स (APKs), एसएमएस किंवा व्हॉट्स ॲपद्वारे खोट्या लिंकद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यातून वाहनचालक, मालकांची वैयक्तिक माहितीची चोरी तसेच ओळखीचाही गैरवापर होत आहे.

नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी परिवहन विभागाने जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन करण्यावर भर दिला आहे. त्यात अलीकडे आरटीओच्या काही सेवांबाबत कार्यालयात न येता (फेसलेस) कामे करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नूतनीकरण, परवान्यावरील नाव बदलणे, पत्ता बदलणे, वाहन हस्तांतरित करणे, जन्मतारीख बदलणे ही कामे आधार क्रमांकाचा उपयोग करून घरबसल्या करता येत आहेत. पण, अलीकडच्या काळात ‘‘आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरा,’’ असा संदेश पाठवत अनधिकृत लिंक पाठवून त्वरित दंड भरण्याचा इशाराही दिला जात आहे. तसेच ‘‘वाहन चालविण्याचा परवाना ‘सस्पेंड’ होणार आहे. त्वरित तपासणी करा’’ असे संदेश पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यासाठी परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाइल ॲप्स (APKs), मोबाइल एसएमएस/ व्हॉट्स ॲपद्वारे खोट्या लिंक पाठवल्या जात आहेत.
दरम्यान, ‘‘आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाइलमध्ये कधीही व्हॉट्स ॲपद्वारे व इतर मोबाइल ॲपद्वारे ‘पेमेंट लिंक’ पाठविली जात नाही. आरटीओची सर्व अधिकृत संकेतस्थळे ‘.gov.in’ ने समाप्त होतात. ‘.com’, ‘.online’, ‘.site’, ‘.in’ अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाइटवर नागरिकांनी उघडू नये,’’ असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

परिवहन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ
- वाहन नोंदणी सेवा (VAHAN) - https://vahan.parivahan.gov.in
- ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) - https://sarathi.parivahan.gov.in
- परिवहन सेवा - https://www.parivahan.gov.in
- ई-चलन पोर्टल - https://echallan.parivahan.gov.in

या लिंकपासून सावध
‘RTO Services.apk’, ‘mParivahan_Update.apk’, ‘eChallan_Pay.apk’ अशा अनधिकृत APK ॲप्स, लिंक डाउनलोड करू नयेत. तसे केल्यास त्याद्वारे ओटीपी, बँकिंग माहिती व मोबाइलमधील इतर संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते.

येथे करता येते तक्रार
‘‘संशयास्पद संदेश/लिंक आल्यास नागरिकांनी तत्काळ तक्रार नोंदवावी. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. National Cyber Crime Portal - https://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन किंवा १९३० या सायबर फसवणूक हेल्पलाइनवर कॉल करुन तक्रार नोंदवता येते. किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलिस स्टेशनमध्ये जाऊनही तक्रार नोंदवता येते,’ब असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहून योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच या बाबत योग्य माहिती मिळविण्यासाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा वाहतूक विभागाशी संपर्क साधावा. फसवी माहिती आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा.
- शैलेश कामत, परिवहन सहआयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT