पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

कचऱ्यावरुन एकाला मारहाण; दोघांवर गुन्हा
पिंपरी : कचऱ्याच्या डब्यातील कचरा सोसायटीच्या ‘ड्राइव्ह वे’ मध्ये टाकू नका, असे सांगितल्याच्या रागातून दोघांनी सोसायटीतील एका रहिवाशाला बेदम मारहाण केली. ही घटना डुडुळगाव येथे घडली. या प्रकरणी अक्षय अरुण मोरे (रा. यशदा सुप्रीम सोसायटी, फेज वन, डुडुळगाव, मूळ- अहिल्यानगर) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिलीप वांढेकर आणि शुभम दिलीप वांढेकर (दोघेही रा. यशदा सुप्रीम सोसायटी, डुडुळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे सोसायटीतील कचऱ्याच्या डब्यातील कचरा ‘ड्राइव्ह वे’ मध्ये फेकत होते. फिर्यादी यांनी त्यांना अडविले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यात फिर्यादीच्या हाताला गंभीर दुखापत झाली.


टेम्पोच्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथील हॉटेल टीपटॉप चौकासमोर घडली.
विशाल अनिल कोटावले (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ यश अनिल कोटावले (रा. सदगुरू नगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन टेम्पो चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे भाऊ विशाल अनिल कोटावले हे दुचाकीवरून कामावर जात होते. दरम्यान, इंद्रायणीनगर येथील टीपटॉप चौक येथे एक सफेद रंगाचा टेम्पो उजव्या बाजूला वळण घेत असताना विशाल यांच्या दुचाकीला समोरून घासला. ही धडक वाचविण्याच्या प्रयत्नात विशाल यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूस जोरात धडकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT